--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

हायर स्टडी.

एक युपीचा भैया व एक बिहारी बाबू मित्र होते.
एकदा बिहारी बाबूने बघितले कि भैया सकाळी उठुन काही पुस्तके घेउन जवळच्या टेकडीकडे चालला आहे.
बिहारी बाबूला राहवले नाही. तो भैयाकडे गेला व विचारले, " भैया सकाळी सकाळी पुस्तके घेउन कुठे जात आहेस ?"
भैया म्हणाला," भई सब लोक स्टडी करता है. हम को लगा हम हायर स्टडी करना चाहिये इस लिये हम ऊपर चढकर हायर स्टडी करना चाहता हूं."

हास्यदिनाच्या शुभेच्छा.



आजच्या धावपळीच्या जीवनात हसायला वेळ काढणे अवघड झाले आहे.
आपण येथे दोन क्षण हसायला येता आपले आभार व आजच्या हास्यदिनाच्या आपल्याला अनेक शुभेच्छा.
आपल्या जीवनांत हास्याचे क्षण वारंवार येवोत हिच या दिवसाची शुभेच्छा.
आपण हसत रहा व आपल्या परिवारातील सगळ्यांना हसत ठेवा.








दंतवैद्य.

दंतवैद्य : दात किडलेला आहे. काढावा लागेल. काही काळजी करु नका काही मिनिटांचचं काम आहे.
रुग्ण : किती पैसे लागतील ?
दंतवैद्य : ६०० रुपये.
रुग्ण : काही मिनिटांचे ६०० रुपये ?
दंतवैद्य : काही हरकत नाही सावकाश काढतो !

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
महाराष्ट्र राज्याची "सर्वोत्तम" प्रगती व्हावी हिच "सर्वोत्तम मराठी विनोदची" ईश्वर चरणी प्रार्थना.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...