Mental Hospital लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Mental Hospital लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मांजर.

तीन वेडे मेंटल हॉस्पिटल मधून पळायचा प्रयत्नात असतात.
पहिला वेडा मांजरीचा आवाज काढत पहरेकर्‍याच्या मागून बाहेर पडतो. पहारेकर्‍याच्या ते लक्षात आले नाही हे बघून दुसरा वेडाही तेच करतो व बाहेर पडण्यात यशस्वी होतो.
तीसरा वेडा बघत असतो व तो मांजरीचा आवाज काढत पहारेकर्‍याकडे जातो व त्याला सांगतो मी पण मांजर आहे.

दरवाजा आणि किल्ली.

एकदा एका मनोरुग्णालयात डॉक्टर आठ रुग्णांची परिक्षा घेणार होते. ज्यामुळे त्यांना तेथुन सुटका होणार होती.
डॉक्टरांनी त्या खोलीच्या एका भिंतीवर खडूने दरवाजा काढला व त्या आठ जणांना सांगितले ते दार उघडा व खोलीच्या बाहेर पडा.
सात जणांनी उठुन त्या दाराने बाहेर जायचा खुप प्रयत्न केला पण एक जण आपल्या जागेवरच बसुन राहिला.
डॉक्टरांनी त्याला न उठण्याचे कारण विचारले असता तो म्हणाला, " मी त्या दाराच्या कुलूपाची किल्ली घेउन बसलो आहे."

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...