--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.: शोध
शोध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शोध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

न्यूटनच्या बायकोचा उखाणा

न्यूटनच्या बायकोचा उखाणा :-

आईला पाहून बाळ खुदुखुदू हसलं…
आईला पाहून बाळ खुदुखुदू हसलं…
डोक्यावर पडलं सफरचंद,
तर खायचं सोडून येडं शोध लावत बसलं…!!

कोलंबसची मराठी बायको !

जर कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला


नसता... कारण बायकोने विचारले असते...

कुठे चाललात?

कोणा बरोबर?

कसे जाणार?

... काय शोधायला जाताय?

इकडे मिळणार नाही का?

नेहमी तुम्हीच का?

मी इथे एकटी काय करू?

मी पण येऊ का?



कोलंबस: जाउ दे नाही जात...
 
(फेसबुकवर हे पोस्ट करणार्‍या मित्राचे आभार. मूळ लेखक माहित नाही.)

अंतर !

सुरेशचा एका आजोबांसोबत वाद सुरु होता. तो म्हणाला,"आजोबा, तुमचा काळ वेगळा होता. आज बघा आमच्याकडे फास्ट कार आहेत, टिव्ही आहेत ज्यावर कायम काहीतरी सुरु असते, जेट विमाने आहेत, अंतराळ प्रवासासाठी वाहने आहेत आणि.................

सुरेश थांबलेला बघुन आजोबा म्हणाले,"हे सर्व आमच्या पिढीने शोधले तुमच्या पिढीसाठी ! तुम्ही तुमच्या पुढल्या पिढीसाठी काय करताय !"

जन्म.

बांता : ऑक्सिजन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. या वायूचा शोध १७७३ साली लागला.


सांता : अरे देवा, बरं झाल माझा जन्म त्यापुर्वी नाही झाला.

बायकोचा शोध.

पराग आपल्या मित्राला सांगत होता," अरे, मी ज्या-ज्या मुलीला लग्नासाठी पसंत करतो ती मुलगी आईला आवडत नाही. काय करू कळत नाही."
मित्र : तु तुझ्यासाठी तुझ्या आईसारखीच एखादी मुलगी बघ. ती तुझ्या आईला आवडेल.
पराग काही दिवसांनी : अरे मी अगदी आईसारखीच मुलगी शोधली पण बाबा माझा व तिचापण राग करायला लागलॆ.

शोध !

" मी माझी अख्खी हयात या शोधात घालवली." एक वैज्ञानिक सांगत होते.
"तर तुम्हाला या शोधात यश मिळाल कां ?" एक प्रश्न.
"हो ना असे एसिड शोधण्यात मी यशस्वी झालॊ ज्यात काहीही विरघळू शकेल."
प्रश्न," आपल्याला या यशानंतर धन संपत्ती किती मिळाली ?"
"नाही, धन संपत्ती किती मिळेल ठाऊक नाही, सध्या होती ती संपत्ती या एसिडच्या शोधात विरघळून गेली आहे एवढ नक्की !"

शोध.

शिक्षक : मुलांनो, फळ्याजवळ जाऊन नकाशावर अमेरिका कुठे आहे हे कोण दाखवू शकते कां ?

बाळू : सर, मी दाखवतो.

(बाळू अमेरिका कुठे आहे ते बरोबर दाखवतो.)

शिक्षक : शाब्बास बाळू.

शिक्षक : आता सांगा, मुलांनो अमेरिकेचा शोध कुणी लावला.

सगळा वर्ग एका स्वरात : बाळूने SSSSSSSSS.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...