अमेरिका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अमेरिका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कोलंबसची मराठी बायको !

जर कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला


नसता... कारण बायकोने विचारले असते...

कुठे चाललात?

कोणा बरोबर?

कसे जाणार?

... काय शोधायला जाताय?

इकडे मिळणार नाही का?

नेहमी तुम्हीच का?

मी इथे एकटी काय करू?

मी पण येऊ का?कोलंबस: जाउ दे नाही जात...
 
(फेसबुकवर हे पोस्ट करणार्‍या मित्राचे आभार. मूळ लेखक माहित नाही.)

देवाची देणगी.

एकदा ब्रम्हदेव आपल्या सर्व दूतांना व कर्मचार्‍यांना एका बैठकित सांगत होते," हे बघा, आपल्याला काही चांगले निर्माण करायचे असेल तर तेथेच काहीतरी वाईट पण द्यावे. म्हणजे त्या क्षेत्रात संतुलन कायम रहाते. सर्व कामे अशी करायची कि कोठेही संतुलन बिघडता कामा नये.
थोडे थांबुन देव म्हणाले," कुणाला काही अडचण ? माझे म्हणणे कुणाला कळले नसेल तर विचारा मी माझ्या म्हणण्य़ाचे स्पष्टीकरण द्यायला तयार आहे."
काही वेळाने एक देवदूत ऊभा राहिला व देवाला म्हणाला,"देवा आपले म्हणणे कळले पण आपण एखादे उदाहरण द्याल का ?"
ब्रम्हदेव म्हणाले," हे बघा मी अमेरिकेला सर्व काही दिले आहे. तेथील लोकांना मी भरभरुन श्रीमंती दिली, मजा करायला बरिच ठिकाणे दिली पण त्यांना भितीही दिली.  त्यांना कायम भिती वाटत असते."
दूसरा देवदूत म्हणाला, " देवा अजुन एक उदाहरण द्याना."
ब्रम्हदेव म्हणाले," मी अफ्रिकेला निसर्गाचे दान भरभरुन दिले पण त्यासोबतच गरिबीही दिली."
तर तिसरा देवदूत म्हणाला," देवा तुम्ही म्हणता ते बरोबर नाही, आपण सर्वच ठिकाणी असे संतुलन सांभाळत नाही. आता बघाना भारताला निसर्गाचे दान दिले, समॄद्धि दिली, श्रीमंती दिली व कुठेच काही कमी दिसत नाही."
देव म्हणाले," होय तेथेही मी संतुलन कायम राखले आहे. त्यांना शेजारी मी पाकिस्तान दिलाय ना."

प्रवास.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात येऊन गेल्यावर आपल्या लालू भैय्यांना आपण पण अमेरिकेला जावे असे वाटू लागले.
लालू भैय्यांनी विमानतळावर फोन करुन विचारले," अमेरिकेला जायचे असल्यास किती वेळ लागेल ?"

पलिकडून," एक मिनिट हं."

लालू भैय्या," धन्यवाद."

अनिवासी !

श्रीमंत बाई : काल तु आला नाहीस ?
भिकारी : बाई, काल माझा चुलत भाऊ आला होता.
बाई : कुठे असतो तुझा भाऊ ?
भिकारी : अमेरिकेला.
बाई : काय, करतो तिथे तो ?
भिकारी : तो तिथे भिक्षा मागतो.

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...