Doctor लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Doctor लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

विसर !

नाना : (किंचाळत) डॉक्टर, मला बघाना काय झालय. मी सगळ विसरतोय.

डॉक्टर : थांबा शांत रहा, तुम्हाला अस कधि पासुन होतय ?

नाना : काय म्हणालात, काय कधि पासुन होतय ?

आजार ?

डॉक्टर : तुम्हाला मलेरिया झाला आहे.
रुग्ण : डॉक्टर, खरच मलेरिया झालाय ना ? एकदा एकाला डॉक्टरांनी मलेरियाची औषधे दिलीत पण तो टॉयफाईडने मेला.
डॉक्टर : नाही, माझे रुग्ण मलेरियाचे औषध दिल्यावर मलेरियानेच मरतात.

डॉक्टर सांता.

डॉक्टर सांताने फार गंभीर चेहरा करुन हातात टॉर्च घेऊन पेशंटचे डोळे तपासले, जिभ बघितली, कान तपासले आणी.........
बराच विचार करुन म्हणाला..........
टॉर्च चांगला आहे !!!

सांताची अंगदुखी.

सांता डॉक्टरला : डॉक्टर सर्व अंगावर दुखते आहे.
डॉक्टर : कुठे दुखते आहे ?
सांता : (सांता एका बोटाने दाखवतो) हे बघा, डाव्या पायाला हात लावला तर दुखते.
डॉक्टर : आणि ?
सांता : हे बघा, उजव्या पायाला हात लावला तरिही दुखते.
डॉक्टर : आणि ?
सांता : कानाला हात लावला तरिही दुखते.
डॉक्टर : आणि ?
सांता : कपाळाला हात लावला तरिही दुखते.
डॉक्टर : तुम्हाला काही झालेले नाही, तुमचे बोट दुखावलेले आहे.

अमेरिका संकटात का आहे ??? ..... !!!

एकदा एक ईझराइली, जर्मन, रुशियन व एक अमेरिकन डॉक्टर आपापल्या देशातील औषधे किती प्रगत आहेत या बद्दल बोलत असतात.
ईझराइली डॉक्टर म्हणतो," आमच्याकडे औषधे ईतकी प्रगत आहेत की आम्ही एकाची किडनी काढतो दुसर्‍याला लावतो व तो सहा आठवड्यात कामावर हजर असतो."

जर्मन डॉक्टर म्हणतो," हे काहीच नाही. आम्ही तर एकाचे फुफ्फूस काढतो दुसर्‍याला लावतो व तो चार आठवड्यात कामावर हजर असतो."

रशियन डॉक्टर म्हणतो," आम्ही तुमच्याही पुढे आहोत. आम्ही एकाचे अर्धेच हॄदय काढतो दुसर्‍याला लावतो व दोघेही दोन आठवड्यात कामावर हजर रहातात."

अमेरिकन डॉक्टर म्हणतो, " तुमच्या कोणाहीपेक्षा आम्ही जरा जास्तच पुढे आहोत. आम्ही टेक्सास मधल्या बुध्धि नसलेल्या माणसाला निवडले. त्याला व्हाईट हाऊस मध्ये बसवले व आता सर्वच अमेरिकन्स नोकर्‍या शोधताहेत."

हार !

ऑपरेशन आधि रुग्णाला सर्व तयारी सोबत टेबलवर एक हारही दिसतो.
त्यामुळे तो काहिसा उत्सुक होऊन डॉक्टरला विचारतो, " डॉक्टर, बाकी तयारी मी समजू शकतो पण हा हार कशासाठी ?"
डॉक्टर : हे बघा हे माझं पहिलच ऑपरेशन आहे. समजा ते यशस्वी झालं तर हा हार माझ्यासाठी नाही झाल तर तो............. तुमच्यासाठी."

विस्मरण.

एके दिवशी मी डॉक्टरांकडे गेलो.
डॉक्टरांनी मला विचारले काय होतेय. मी सांगीतले हल्ली मला फार विसरायला होतेय.
तर.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
डॉक्टरांनी मला तपासण्यापूर्वीच त्यांचे बिल दिले !!!

नळाला मासे !

एक वेडा नळाचे पाणी ओंजळीने घेउन बादलीत टाकत असतो. तर एक डॉक्टर त्याला विचारतो काय रे काय करतोस ?
वेडा : दिसत नाही का मी मासे पकडतोय.
काही वेळाने तो डॉक्टर त्याला पुन्हा विचारतो : काय रे किती मासे पकडलेत ?
वेडा : काय वेडा डॉक्टर आहे राव नळाला कधी मासे येतात कां ?

(ई-मेलने पाठविणार्‍याचे नाव कळवलेले नाही)

शस्त्रक्रिया.

डॉक्टर ऑपरेशन टेबलवरच्या रुग्णाला : " तुम्हाला घाबरायला काय झालं ? घाबरु नका. काही होणार नाही."
रुग्ण : डॉक्टर माझं हे पहिलच ऑपरेशन आहे.
डॉक्टर : बघा माझही हे पहिलच ऑपरेशन आहे तरिही मी घाबरलेलो नाही.

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...