स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानबध्दतेतून सुटल्यावर त्यांचे दौरे सुरु झाले. त्यामुळे कॉग्रेसवाले मत्सराने खदखदू लागले. त्यापैकी एक प्रसिध्द गांधीवादी श्री. जाजू म्हणाले," सावरकर सोलापूरला आले तर आम्ही त्यांची गाढवावरुन मिरवणूक काढू !"
हे वृत्त आचार्य अत्रे यांना कळले. दुसर्या दिवशी ते पुण्यातील एका सभेत उत्तरले ," लोकहो, तो गाढव आपणास शोधावयास नको, आपण वीर सावरकरांना जाजूंच्याच खांद्यावर बसवू म्हणजे झाले !"