--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.: नवरा
नवरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नवरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

फरक !

बायको नवऱ्याला : तुम्हाला झाडावर चढता येते का ?

नवरा : नाही . 

बायको : तुमच्यापेक्षा  माकड बरा . 

नवरा बिचारा कसा बसा २ महिन्यात झाडावर चढायला शिकतो . 

नवरा बायकोला : हे बघ मी झाडावर चढू शकतो . 

बायको : तुमच्यात आणी माकडात काय फरक राहिला !!!

स्वर्ग

पत्नी पतीला : असं ऐकले आहे की स्वर्गात पती पत्नीला एकत्र राहू देत नाहीत

पती : अगं वेडे म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात !

एक यशस्वी नवरा ...

लोक आपल्या बायकांना इतके का घाबरतात, काही समजतच नाही…

मी मात्र याला अपवाद आहे. माझ्या घरचा मी राजा आहे.

जेव्हा मला थंड पाण्याने भांडी धुवायचा मूड असतो, तेव्हा मी थंड पाण्याने धुतो, जेव्हा गरम पाण्याने धुवायचा मुड असतो, तेव्हा गरम पाण्याने धुतो.

याबाबतीत मी इतर कोणाचंच ऐकत नाही।।।

लादी पुसताना फिनाईल घ्यायचं की लायझोल,

माझं मीच ठरवतो…

एक शब्द बोलायची बायकोची हिम्मत नसते…

सकाळचा चहा बनवून बायकोला जागं केल्यावर, चहा बेडवरच प्यायचा, की ड्रॉईंग रूम मध्ये प्यायचा की बाल्कनीत बसून प्यायचा, निर्णय माझाच असतो. काय हिम्मत आहे ती लुडबुड करेल…

कपडे सर्फ एक्सेलने धुवायचे की टाईड ने, तिथेही माझंच राज्य चालतं…

याबाबतीत तर मी बायकोला इतकं अज्ञानी करून ठेवलंय की तिला अजून वॉशिंग मशीन कशी चालवावी, हेही माहीत नाही…

कोणत्या झाडूनं घर झाडायचं, हा निर्णय दस्तुरखुद्द आम्हीच घेतो.

जेवायला काय बनवायचे हे बायको कोण सांगणार? माझ्या इच्छेनुसार मीच तिला विचारून बनवतो…

काच ओल्या फडक्याने पुसायची की कोलीन शिंपडून, चर्चा होतंच नाही…

रविवारी शौचालय सकाळी स्वच्छ करायचं कि संध्याकाळी, हे देखील मीच ठरवतो…

आणि सर्वात महत्वाचं ...

रात्री झोपण्यापूर्वी तिचं डोकं आधी चेपायचं की पाय, निर्णय माझाच असतो…

मी on the spot निर्णय घेतो.

अरे बाबांनो, घरातील सर्व मोठे निर्णय घेता येणं, यात तर खरी पुरुषाची शान आहे!

पण तुम्ही निराश होऊ नका. माझा हेतू तुम्हाला जळवायचा किंवा तुमचं मनोबल खच्ची करण्याचा नाही…

एक यशस्वी नवरा ...

कामचोर बायको

घटस्फोटाच्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू असते…



वकील : एवढं काय झालं की मधुचंद्राच्या रात्रीच तुम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला?


नवरा : मी तिला लाडानं म्हटलं, जरा चेहऱ्यावरचा पदर बाजूला कर… तर ती म्हणाली तुम्हीच करा…


तेव्हाच समजलं की ही बाई एक नंबरची कामचोर आहे…

महत्वाचा प्रश्न !

लग्न झालेल्यांसाठी एक प्रश्न:

उत्तर फक्त हो किंवा

नाही मध्ये द्यावे,

आता तुमच्या बायकोने तुम्हाला

मारणे बंद केले आहे का ?

डाळीचे दर वाढल्यामुळे मृत्यू.

नवरा: अगं, आपल्या शेजारच्या वहिनी कशाने गेल्या?

बायको: डाळीच्या किंमती वाढल्यामुळे.

नवरा: काय? वेडबीड लागलंय का तुला?

असं कसं होऊ शकेल? वाट्टेल ते बडबडू नको.

बायको: अहो, मी त्यांचं death certificate माझ्या या डोळ्यांनी पाहिलंय.

नवरा: मग ? काय होतं त्यात ??

बायको: त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं, "Death due to High Pulse Rate". डाळीचे दर वाढल्यामुळे मृत्यू.

नवरा सध्या कोम्यात आहे म्हणे !

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? .
.
वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले
आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर
ती माझी मुलगी माझी आईं झाली! त्यांना एक
मुलगी झाली
तर ती माझी बहिण झाली !
पण मी तिच्या आज्जीचा नवरा होतो म्हणून
ती माझी नातं झाली! ह्याच प्रमाणे
माझा मुलगा त्याच्या आज्जीचा भाऊ झाला!
आणि मी माझ्या मुलाचा भाचा झालो ! .
आणि माझा बाप माझा जावई
झाला आणि माझा मुलगा त्याच्या आज्जीचा मेहूणा झाला
आणि माझी बायको माझी
.
.
डॉक्टर: बस कर! तुझ्या आईचा घोडा ……… ????? ..!!!
आता मला पण वेडा करनार आहेस का हरामखोर !

सुंदर जग

नवरा : काय पूर्ण दिवस इंटरनेट वर घालवतेस.

ह्या व्यतिरीक्त पण एक सुंदर जग आहे ते बघ.
.
.
.
.
.
.
.
.
.
बायको : लिंक पाठव...😂😝

खानदेशी लाड !!!

खानदेशचे पती पत्नी मधील हे प्रेमळ संवाद ............. आमच्या पुढे जे ताटात येईल ते आम्ही जेवतो बाबा ......... पण इथे हे लाड बघा ...........  

नवरा :- जेवाले काय बनावशी  ?
बायको :- तुम्ही सांगश्यात ते बनावसू..... !

नवरा :- कर, वरण भात पोया...
बायको :- ते ते कालदिनच करेल व्हतं ...

नवरा :- बेसण कर तावावरलं...
बायको :- पोरे खातस नई ना ते...

नवरा :- वटाणास्नी चटणी कर...
बायको :- ती पचाले जड जास...

नवरा :- तुले जे आवडस व्हई ते बानाव ...
बायको :- तुम्हीच सांगा ना, तुम्ही सांगश्यात ते बनावसू मी !

नवरा :- आंडा कर मंग...
बायको :- काही वाटस का, सोम्मार शे आज...

नवरा :- आरे हा, धिंडरा कर मंग...
बायको :- त्यासना भलता कुटाणा पुरस...

नवरा :- तोरनी दायन्या चिखल्या बनाव..
बायको :- तोरनी दाय ते कालदिनच सरनी...

नवरा :- मंग मॅगी बनाई टाक...
बायको :- हाट, ते का जेवण शे का?

नवरा :- मंग काय बनावशी...
बायको :- तुम्ही सांगश्यात ते...

नवरा :- आसं, कर खिचडीच बनाई टाक ...
बायको :- नको ,नुसती खिचडी खाई खाई कटाया येत नही  का?

नवरा :- काय बनावशी मंग
बायको :- त्येच ते सांगी राहिनू, तुम्ही सांगश्यात ते बनावसू...

नवरा :- आसं कर, आपण जेवाले बाहेर जाऊत....
बायको :- नको, बाहेरनं खाईसन भलता त्रास व्हस तुभ्हले....

नवरा :- (नवरा मन् मा नी मन् मा, इनी मायनी भूखे भूखे मारी की काय आज?..)
बायको : फोनवर : काय व्हयनं ? काहीतर बोला,

नवरा :- शांत...
बायको :- (मन् मा नी मन् मा फोन कट व्हयना की काय? .....)

नवरा :- दख, तुले जे पटी ते बनाव
बायको :- सांगा ना, तुम्ही सांगश्यात ते बनावसू...

नवरा :- घरमा दुध शे  का ? पाव बिव खाऊत त्याना बरोबर....
बायको :- तुम्ही ते कायभी सांगतस पावसवर काय पोट भरस?

नवरा :- नुसता भात बनाव मी येवाना टाईमले दही लई येस...
बायको :- नको, दहीनी सर्दी व्हस तुम्हले.......

नवरा :- मंग पोरेसले जे आवडस व्हई ते बनाव...
बायको :- पोरे ते कायभी सांगतीन,  तो काय खे शे का?

नवरा :- आते तूच दख, तुले पटी ते बनाव, मनी आक्का..........
बायको :- आसं नका, तुम्हीच सांगा ना, तुम्ही सांगश्यात ते बनावसू मी !

                       जय खानदेश !!!

नविन नवरा .

नविन नवरा व नविन कुत्रा यात काय फरक आहे ?


नविन कुत्रा एका वर्षाने पण तुमच्याकडे बघुन आनंद दाखवतो........ !

गैरसमज !

बायको : काल तुम्ही मला झोपेत शिव्या देत होता.

नवरा : नाही ग.

बायको : हो, मी ऎकल्या. तुम्ही झोपेत मलाच शिव्या देत होता.

नवरा : तुझा गैरसमज आहे.

बायको : काय, कोणता गैरसमज ?

नवरा : मी झोपलो होतो.

आंधळा !

आंधळा भिकारी : सुंदरी, मला ५ रुपये दे ना. काल पासुन उपाशी आहे.

बाईचा नवरा भिकार्‍याला १० रुपये देतो.

बाई : अहो हे काय त्याने पाच रुपये मागितले होते ना ?

नवरा : अग तो खरच आंधळा आहे. त्याने तुला सुंदरी म्हटले !

बघुन चाला.

एक बाई देवाघरी गेल्या.
घरुन अंत्ययात्रा सुरु झाली. काही अंतर गेल्यावर खांदा देणार्‍या एकाला ठेच लागली व तो पडला तसेच इतर तिघांचा तोल जाऊन तिरडी खाली पडली.
तिरडी खाली पडताच बाई उठुन बसल्या व चांगल्या दहा वर्षे जगल्या. दहा वर्षांनी परत बाईंची अंत्ययात्रा सुरु झाली.

थोड्या वेळात बाईचा नवरा खांदा देणार्‍यांना सांगू लागला," बघुन चाला हं. बघा नाहीतर मागल्या सारखी कोणाला परत ठेच लागेल."

सुंदर बाई !

नवरा घरी आल्यावर....

बायको : अहो,  मी आज ना जगातली सर्वात सुंदर बाई बघितली.


नवरा : मग काय केल तु ?


बायको : काही नाही, थोड्या वेळाने मी आरश्या समोरुन बाजुला झाले.

श्रेय !

मुलाकातकार : तुम्ही कोट्याधिश झालात या यशाच श्रेय कोणाला द्याल ?
कोट्याधिश : मी माझ्या सर्वच बाबतीतल श्रेय माझ्या पत्निला देतो. मी आज जे काही आहे ते तिच्या मुळेच.
मुलाकातकार : तर तुमची बायको फारच कर्तुत्ववान आहे. तुम्ही लग्नापुर्वी काय होता ?
कोट्याधिश : अब्जाधिश.

संकट.

ती : ऑफिसला जाताना तुम्ही माझा फोटो आपल्या पाकिटात का ठेवता ?
तो : अग त्यामुळे माझी संकटं लगेच सुटतात.
ती : कस कायं ?
तो : अगं, कोणतही संकट आलं किंवा कठिण काम आल की मी पाकिटातुन तुझा फोटो काढुन त्याकडे बघतो, त्यामुळे तुझ्यापुढे कोणतेही संकट हल्क वाटयला लागते !!!

घटस्फोट.

साहेब माझी बायको गेले सहा महिने माझ्याशी बोलतच नाहीये. मला तिच्यापासुन घटस्फोट मिळवून द्या. मी तुम्हाला हवे तितके पैसे द्यायला तयार आहे.
वकिल: काय तुम्ही नशिबवान, अहो अशी बायको मिळत नाही. घटस्फोट घेऊ नका.

पांढरे कपडे !

नवरा : अग बघ मी माझ्या हातानेच आज कपडे धुतलेत.
बायको : हो का ?
नवरा : बघ ना कसे छान स्वच्छ पांढरे झालेत.
बायको : हो ना तुमचा आवडीचा तो लाल शर्ट पण स्वच्छ पांढरा झालाय.

साडी.

बायको : अहो, मला आज पहाटे स्वप्नात दिसल, तुम्ही साडी घ्यायला मला ५००० रुपये दिलेत. पहाटेच स्वप्न खर होणार कां ?
नवरा : होणार ना. ठेव ते ५००० रुपये तुच आणि आण त्याची साडी.

त्रस्त !

एकदा स्वर्गाच्या दारात प्रवेश घेणार्‍यांची रांग लागली होती.
बायकांना अर्थातच स्वर्गात सरळ प्रवेश होता व पुरुषांना रांगेत उभे राहुन परिक्षा दिल्यावर प्रवेश मिळायचा.
पुरुषांची रांग दोन प्रकारची होती.
एका रांगेत असे पुरुष होते जे जिवंतपणी त्यांच्या बायकोच्या धाकात होते तर दुसर्‍या रांगेत जे आपल्या बायकोच्या धाकात नव्हते.
धाकात असणार्‍यांची संख्या प्रचंड होती तर धाकात नसणार्‍या लोकांच्या रांगेत फक्त एकच माणूस ऊभा होता.
सर्व जण त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते व त्याच कौतुकही करत होते.
शेवटी एकाने त्याला त्याच्या हिमतीच कौतुक करत यातील गुपीत विचारले.
तेंव्हा तो म्हणाला, " अरे गुपीत काही नाही, माझ्या बायकोने सांगीतल म्हणुन मी येथे उभा आहे."

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...