--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ? 

पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात दिले आहेत . मग तुम्हाला २/४ खडे चावता येत नाहीत ?

शोकसंदेश

येणाऱ्या काळात एखादा

माणूस मयत झाला तर शोकसंदेश अशा प्रकारचा असू शकेल.....!

खरोखर खूप चांगला माणूस होता..

"नेहमी ऑनलाइन असायचा..."

"प्रत्येकाची रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करायचा."

"कुणीही आपल्या कमेंटने कधी दुखावले जाऊ नये याची काळजी घ्यायचा."

"त्याची पोस्ट खुपच इंप्रेसिव्ह असायची."

"मोठ्या हृदयाचा माणूस होता. कधी कोणाला ब्लॉक नाही केलं."

"मित्रांच्या सेल्फीला आणि फोटोंना मोठ्या मनाने लाईक करायचा."

"काही नाही झालं तरी इतरांच्या पोस्टला

😂✔👌🏻🙏🏼👻😜

वगैरे सिंबॉल टाकून त्यांच्या पोस्टला दाद द्यायचा."

"जेव्हा मरण आलं तेव्हा पण फेसबुकवर ऑनलाईन बसला होता. खूपच चांगला माणूस होता. ....

😜😜

न्यूटनच्या बायकोचा उखाणा

न्यूटनच्या बायकोचा उखाणा :-

आईला पाहून बाळ खुदुखुदू हसलं…
आईला पाहून बाळ खुदुखुदू हसलं…
डोक्यावर पडलं सफरचंद,
तर खायचं सोडून येडं शोध लावत बसलं…!!

पत्नीची डोकेदुखी

पत्नी : रोज माझे अर्धेच डोके दुखते. डॉक्टर ला दाखवावे लागेल .

पती पेपर वाचायच्या तंद्रीत म्हणतो : त्यात डॉक्टर ला काय दाखवायचे ? जेवढे आहे तेवढेच दुखणार !

आता पतीचे सर्व अंग दुखते आहे !!!

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...