--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.: राजकारणी
राजकारणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकारणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

विजयाचे रहस्य !

उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्यावर समाजवादी व कॉंग्रेसचे उमेदवार असलेले दोन राजकारणी भेटतात व  समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाचे रहस्य काय असावे यावर चर्चा करित असतात.

कॉंग्रेसचा उमेदवार : मी माझ्या पक्षाचा विजय होईल याची कायम काळजी घेत होतो. समजा मी टॅक्सीने प्रवास केला तर त्या टॅक्सी ड्रायव्हरला १०० रुपयाची टीप देउन कॉंग्रेसला मतदान करायला सांगायचो.

समाजवादी पक्षाचा उमेदवार : मी पण तसच करायचॊ. मी टॅक्सी ड्रायव्हरला मीटर प्रमाणेच भाडॆ द्यायचो व कॉंग्रसला मतदान करायला सांगायचो.

थैमान.


काल पुन्हा एकदा मुंबईत अतिरेक्यांनी घातलेल्या थैमाना नंतर आपल्या लाडक्या पंतप्रधानांनी व मुख्यमंत्र्यांनी सर्व जनतेला शांत रहाण्याचे आवाहन केले आहे.

महोदय, तुम्ही शांत बसा व आम्ही पण शांत बसतो.

या घटनेनंतर अतिरेक्यांचा निषेध करण्या ऎवजी आपण आपल्या राजकारण्यांचा निषेध करुया व या बॉंबस्फोटात मृत झालेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहूया.

सामान्य माणुस अजुन काय करु शकतो ?

नविन वर्ष ठराव.

आज नविन वर्ष सुरु झाल. काल नविन वर्षाच्या संध्याकाळी सर्व पक्षातल्या प्रमुख नेत्यांची एक गुप्त बैठक झाली. सरत्या वर्षात गाजलेल्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक फारच शांतपणे झाली. सर्व नेत्यांनी नविन वर्षात सामंजस्याने वागायचे ठरवले व यापुढे एकमेकांवर २०१० मध्ये झालेली चिखलफेक न करण्याचे ठरवले.
बैठकीत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली व बहुतेक ठराव एकमताने संमत करण्यात आले. ते मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
१. नविन वर्षात कोणताही नविन घोटाळा करायचा नाही. सवयी मुळे एखादा घोटाळा झाल्यास त्यावर फार चर्चा न करता झालेला फायदा सर्वांनी सारखा वाटून घायचा.
२. कोणताही जूना मुद्दा या वर्षी उखरुन काढायचा नाही.
३. राष्ट्राच्या हिताचाच विचार मनात आणायचा. असा विचार मनात आणायला (सवय नसल्याने) बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. तितका वेळ सर्वांनी शांतता पाळायची. हा कालावधी किती असावा यावर फार गंभीरपणे चर्चा झाली. बैठकीच्या शेवटी असा कोणताही कालावधी लगेच ठरवणे शक्य नसल्याने एक सर्व पक्षीय समिती स्थापुन तोडगा काढायचे ठरवण्यात आले आहे.

ही बैठक अतिशय गुप्त होती यात इतरही विषयांवर चर्चा झाल्याचे कळते. सर्व मुद्दे कळल्यावर वाचकांना कळवले जाईल.

साम्य.

राजकारणी आणि अतिरेकी या दोघांत काय साम्य आहे ?\
.
.
.
.
.
.
दोघांसोबत सुरक्षा रक्षक असतात.
.
.
राजकारण्यां सोबत सुरक्षा रक्षक असतात कारण यांच्यापासुन लोकांच रक्षण करायला.
अतिरेक्यांसोबत सुरक्षा रक्षक असतात यांना लोकांपासुन वाचवायला, लोक यांना जीवंत ठेवणार नाहीत.

नेता !

नेता (व्याख्या): असा माणुस जो निवडणुकीपुर्वी तुम्हाला शोधत असतो व निवडणुकीनंतर तुम्ही त्याला.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...