--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.: कार
कार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

हाव !

एकदा गणपतरावांनी शॅम्पुचा एक पॅक विकत आणला. दोन दिवस वापरल्यावर ते त्यावर फारच खुष झाले व अतिउत्साहाच्या भरात त्यांनी त्या शॅम्पुच कौतुक करणार एक मोठ्ठ पत्र त्या कंपनीच्या पत्यावर पाठवल. आठवड्यात कपनीने त्यांना त्यांच्या इतर उत्पादनांनी भरलेले एक मोठ्ठ पार्सल पाठवल. गणपतराव फारच खुष झाले.

त्यांची बायको पण गणपतरावांच्या हुशारीने भाराऊन गेली.

गणपतरावांना त्यानंतर म्हणाली," आता काय करायच ?"

गणपतराव म्हणाले," आता मी एखाद्या कारच कौतुक करणार पत्र कंपनीला पाठवतो, बघुया ते किती गाड्या पाठवतात !" 

धडक.

पोलीस : काय हो, तुम्हाला धडक देणार्‍या त्या कारचा नंबर बघितला का किंवा तुम्ही कार मधल्या कोणाला बघितल का ?

नाही, पण मला खात्री आहे कार चालवणारी माझी सासू होती.

पोलीस : तुम्हाला अस का वाटतय ?

मी माझ्या सासूच्या हसण्याचा आवाज चांगला ओळखतो.

ब्रेक ?

बांता : अरे सांता, तु कार इतक्या वेगात का चालवतो आहेस ?
सांता : अरे कारचे ब्रेक फेल झालेत. मला वाटते लौकरच घरी पोहचलेल बर.

विमा !

एक विमा एजंट आपल्या बायकोला कार चालवणे शिकवत होता. वेग थोडा वाढल्यावर त्याच्या लक्षात आले कि गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत. त्याने बायकोला तशी कल्पना दिली.

बायको : आता मी काय करू ?

एजंट : काहीही कर पण लक्षात ठेव फार महागड्या वस्तुला धडक देवू नको. त्याची भरपाई आपल्याला महागात पडेल !

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...