देसाई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
देसाई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गच्छंती.

मि. देसाई तुम्हाला नोकरिवरुन काढलं जातय. बॉस देसाईला म्हणाला.
पण सर. -देसाई
बॉस : पण काय ?.
देसाई : पण सर, मी काहिही केल नाही.
बॉस : होय खरयं. तुम्हाला काम करण्यासाठी कामावर ठेवलय. त्यामुळे, काहिही काम न करण्यामुळे तुम्हाला कामावरुन काढण्यात आलय !

फोनच बील.

फोनच बील फार जास्त आल्यावर श्री. देसाईंनी सकाळी नाश्त्याला सगळे बसले असताना विषय काढला की फोनच बील एवढ कां ? मी तर सगळे फोन ऑफिस मध्ये असतांनाच करतो. एवढ मोठ बील मला परवडत नाही.
सौ. देसाई : मी पण सगळे फोन माझ्या कार्यालयातुनच करते.
देसाईंचा मुलगा : मी घरुन कधिच फोन करित नाही. कंपनीने मला वेगळा फोन दिला आहे. मी तोच वापरतो.
देसाईंची मोलकरिण : त्यात काय बिघडलं ? आपण सगळेच आपल्या कामाच्या ठिकाणचेच फोन वापरतोनां ?

प्लॅटफॉर्म तिकीट.

श्री देसाई त्यांच्या हट्टी, हेकेखोर व मुर्खपणा साठी प्रसिद्ध. तसेच त्यांना त्यांच्या पैशाचा फार दुराभिमान.
एकदा ते एका नातेवाईकाला रेल्वे स्टेशनवर सोडायला गेले, अर्थातच गरज होती प्लॅटफॉर्म तिकीटाची.
ते तिकीट खिडकीवर गेले व कारकूनाला फर्स्ट क्लासचे प्लॅटफॉर्म तिकीट मागितले. कारकूनाने असे तिकीट मिळत नसल्याचे सांगूनही श्री देसाईंना ते पटेना.
तेंव्हा स्टेशन मास्तरला भेटून त्यांनी रेल्वे मंत्रालयाला तसे तिकीट उपलब्ध व्हावे यासाठी पत्र लिहीण्यास सांगीतले व ते स्वत:ही त्या प्रयत्नात आहेत !

विमान प्रवास.

श्री. देसाई पहिल्यांदाच विमान प्रवास करीत होते.

त्यांनी विमान कंपनीच्या कार्यालयात दूरध्वनी करून विचारले, " मला मुंबई ते दिल्ली प्रवास करायचा आहे. विमान किती वेळात पोहचेल ?"

कंपनीचा फोनवरिल माणूस म्हणाला," सांगतो, एक मिनीट हं "

देसाई : धन्यवाद माहिती दिल्याबद्दल, आपला फार आभारी आहे !

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...