वर्ग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वर्ग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

देव कसा असतो !

एका शिशू वर्गात एकदा बाईंनी मुलांना सांगितल, तुम्हाला आवडेल ते चित्र काढा.

सर्व मुलांनी लगेच दिलेल्या कागदांवर चित्रे काढायला सुरुवात केली.

थोड्या वेळाने वर्गात चक्कर मारताना बाईंनी एका मुलीचे चित्र बघितले व विचारले हे काय काढते आहेस तु ?

मुलगी,"बाई मी देवाचे चित्र काढते आहे."

बाई,"पण देव कसा असतो हे कुणालाच माहित नाही."

मुलगी," थोड थांबा मी चित्र काढल्यावर कळेलच देव कसा असतो ते. "

माकड !

वर्गात शिक्षक भुगोल शिकवत असतात.
अफ्रिका व अफ्रिकेतील माकड हा विषय असतो. सरांच्या लक्षात येते कि मंदारच लक्ष वर्गात नाही.
तेंव्हा ते म्हणतात , " अरे मंदार तुझे लक्ष कुठे आहे ? लक्ष माझ्याचकडे ठेव नाहीतर तुला कळणारच नाही माकड कसे असते. "

बंधुप्रेम !

शिक्षक : मुलांनो निष्पाप आणि मुक्या प्राण्यांवर आपण प्रेम करायला हवे, मी जर कुणा माणसाला एका निष्पाप गाढवाला मारतांना बघितले तर मी काय करायला हवे ?
वर्ग : त्याला थांबवायला हवे .
शिक्षक : बर मी त्याला मारण्यापासुन थांबवले तर हे काय दाखवते ?
वर्ग एका स्वरात : बंधुप्रेम !!!

प्रार्थना.

शिक्षीका : मुलांनो सांगा तुम्ही जेवणापूर्वी काय करता ?

मुले :बाई आम्ही हात - पाय स्वच्छ धुतो आणि त्यानंतर जेवायला बसतो.

शिक्षीका : शाब्बास मुलांनो. जेवणापूर्वी हात- पाय स्वच्छ धुवावे आणि देवाची प्रार्थना कोण-कोण करते ?

वर्ग : बाई आमच्या आईला छान स्वयंपाक करता येतो. त्यामुळे आम्ही देवाची प्रार्थना करित नाही.

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...