विमान प्रवास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विमान प्रवास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

वत्सला काकुंचा विमान प्रवास !

वत्सलाकाकू वयाच्या सत्तराव्या वर्षी प्रथमच विमान प्रवास करित होत्या. त्यामुळे त्या बर्‍याच अस्वस्थ होत्या. विमानात चढल्यावर त्या पायलटला भेटल्या व म्हणाल्या,"अरे मला सुखरुप परत उतरवशिल ना ?"


पायलट म्हणाला, "खर सांगु का आजी. मी पंधरा वर्षे विमान चालवत आहे. पण अजुन कुणाला आकाशात सोडून आलो नाही."

प्रवास.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात येऊन गेल्यावर आपल्या लालू भैय्यांना आपण पण अमेरिकेला जावे असे वाटू लागले.
लालू भैय्यांनी विमानतळावर फोन करुन विचारले," अमेरिकेला जायचे असल्यास किती वेळ लागेल ?"

पलिकडून," एक मिनिट हं."

लालू भैय्या," धन्यवाद."

माफी !

नमस्कार, मी या विमानाचा पायलट बोलतोय. आपण आमच्या कंपनीच्या विमानात मुंबई ते दिल्ली प्रवास करीत असल्याबद्दल धन्यवाद.

आपण सध्या ४०००० फुटांवर असून बाहेरच तापमान -४० अंश आहे. बाहेरचं वातावरण स्वच्छ असुन आपण सुरक्षीत आहोत. अरे SSSSSSS बापरे.............

( विमानात थोड्यावेळ स्मशान शांतता पसरते. काही वेळाने पायलट परत बोलतो. )

माफ करा आपल्याला कदाचित भिती वाटली असेल. पण मला कॉफीचा कप घेत असतांना धक्का लागला व गरम कॉफी पायावर पडली व त्याचा चटका बसला. आपण माझी पॅंट बघू शकता कॉफीने समोर पायावर खराब झाली आहे.

"आपण बघू शकता माझीतर माघून खराब झाली आहे. " एक प्रवासी ओरडला.

विमान प्रवास.

श्री. देसाई पहिल्यांदाच विमान प्रवास करीत होते.

त्यांनी विमान कंपनीच्या कार्यालयात दूरध्वनी करून विचारले, " मला मुंबई ते दिल्ली प्रवास करायचा आहे. विमान किती वेळात पोहचेल ?"

कंपनीचा फोनवरिल माणूस म्हणाला," सांगतो, एक मिनीट हं "

देसाई : धन्यवाद माहिती दिल्याबद्दल, आपला फार आभारी आहे !

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...