Polis लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Polis लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रामायण.

हवालदार जेलरला : साहेब, काल सगळे कैदी रामायण करत होते.
जेलर : व्वा छान सुधारताहेत तर आपले कैदी.
हवालदार : नाही साहेब.
जेलर : नाही ? काय झाले.
हवालदार : साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता. तो आतापर्यंत परत आलेला नाही.

धमकी !

सांता पोलीसला फोनवर : हॅलो, पोलीस स्टेशन.
हं बोला काय झाले ?
सांता : मला फोनवर धमक्या येताहेत.
कोण धमक्या देताहेत ? कोण आहेत ते ?
सांता : मला टेलिफोनवाले धमकी देताहेत.
काय ?
सांता : मला म्हणताहेत की, "बिल नही भरा तो काट देंगे.

भाषण.

हवालदार दारुड्याला : अरे ए कुठे चाललास असा रात्रीचा ?
दारुडा : मी भाषणाला चाललोय.
हवालदार : भाषणाला ? कुठे ?
दारुडा : दारुचे वाईट परिणाम या विषयावर भाषण ऎकायला.
हवालदार : तुला रात्री बारा वाजता कोण भाषण ऎकवणार ?
दारूडा : मी घरी पोचल्यावर माझी बायको.

बायको हरवली !

कमलाकर (घाईघाईने) : साहेब ! अहो साहेब ! कॄपया माझी तक्रार लिहून घ्या. माझी बायको हरवली आहे.
साहेब : अहो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे पोलीस स्टेशन नाहीये. हे पोस्ट ऑफिस आहे.
कमलाकर : अस्स होय ! काय आहे, आनंदाच्या भरात मला काही सुचतच नाहीये ! कुणाला सांगू अन कुणाला नाही ?


(प्रेषक : राजेश अशोक कोरे, जळगाव. हास्यरंग, लोकसत्ता, रविवार ३ ऑगस्ट २००८)

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...