मदत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मदत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कॉपी ?

         दोन महिन्यांपुर्वी आमच्या कंपनीत एक नविन साहेब आले. त्यांना ऑफिसचे प्रत्येक काम आपल्या सेक्रेटरीला सांगायची सवय असल्यामुळे कोणतीही मशिन चालवता येत नाही.
         परवा त्यांची सेक्रेटरी रजेवर होती व मला ते संध्याकाळी पेपरचे बारिक तुकडे करणार्‍या पेपर श्रेडर पुढे ऊभे दिसले. त्यांना बघुन मी विचारल ,"सर, काही मदत हविय का ?"

साहेब : हो, मला ही मशिन चालवता येत नाही. जरा मदत कर ना.

मी त्यांच्या हातातला कागद घेतला, मशिन मध्ये घातला व स्टार्ट बटन दाबली. बटन दाबताच कागद आत गेला.

कागद आत गेलेला बघुन साहेब मला म्हणाले," अरे, हा एक अतिशय महत्वाचा कागद आहे मला याच्या दोन कॉपी दे"

बॉसचे अपहरण.

एका कंपनीत सकाळीच खुप धावपळ सुरु झाली. सर्वच लोकं इकडून तिकडे धावपळ करित होते.
.
.
.
काही नविनच रुजु झालेले कर्मचारी धावपळ बघून फारच धास्तावले.
.
.
.
त्यातल्या एकाने मोठ्या हिंमतीने एका जून्या कर्मचार्‍याला विचारले,"काय झाले ?"

आपल्या बॉसला अतिरेक्यांनी पळवले. अतिरेकी बॉसला सोडायला दहा कोटी खंडणी मागताहेत.
नाहीतर ते आपल्या बॉसला पेट्रोल टाकून जाळुन टाकणार.
.
.
.
.
काही लोक त्यासाठीच प्रत्येकाला काही मदत देता येईल का ते विचारायला धावताहेत.


"लोक किती मदत देताहेत ?", नविन कर्मचार्‍याचा प्रश्न.
.
.
.
.
"एक लिटर पेट्रोल.", जून कर्मचारी उत्तरला.

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...