आज नविन वर्ष सुरु झाल. काल नविन वर्षाच्या संध्याकाळी सर्व पक्षातल्या प्रमुख नेत्यांची एक गुप्त बैठक झाली. सरत्या वर्षात गाजलेल्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक फारच शांतपणे झाली. सर्व नेत्यांनी नविन वर्षात सामंजस्याने वागायचे ठरवले व यापुढे एकमेकांवर २०१० मध्ये झालेली चिखलफेक न करण्याचे ठरवले.
बैठकीत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली व बहुतेक ठराव एकमताने संमत करण्यात आले. ते मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
१. नविन वर्षात कोणताही नविन घोटाळा करायचा नाही. सवयी मुळे एखादा घोटाळा झाल्यास त्यावर फार चर्चा न करता झालेला फायदा सर्वांनी सारखा वाटून घायचा.
२. कोणताही जूना मुद्दा या वर्षी उखरुन काढायचा नाही.
३. राष्ट्राच्या हिताचाच विचार मनात आणायचा. असा विचार मनात आणायला (सवय नसल्याने) बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. तितका वेळ सर्वांनी शांतता पाळायची. हा कालावधी किती असावा यावर फार गंभीरपणे चर्चा झाली. बैठकीच्या शेवटी असा कोणताही कालावधी लगेच ठरवणे शक्य नसल्याने एक सर्व पक्षीय समिती स्थापुन तोडगा काढायचे ठरवण्यात आले आहे.
ही बैठक अतिशय गुप्त होती यात इतरही विषयांवर चर्चा झाल्याचे कळते. सर्व मुद्दे कळल्यावर वाचकांना कळवले जाईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा