--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

Husband


जो नेहमी हसत असतो त्याला

HAS MUKH म्हणतात…

आणि ज्याचं हसणं कायमच बंद होत त्याला

HUS BAND म्हणतात.

😂🤣😂🤣😂🤣😂🤣

एका वाक्यात विनोद !

 खरं तर मलाही डॉक्टरच व्हायचं होतं पण मार्क कमी पडले म्हणून पेशंट झालो..

वचन.

रात्री 2 च्या सुमारास आडवळणाच्या एका हॉटेलमध्ये एक साधू महाराज जातात. व तिथल्या
मॅनेजरला म्हणतात मला खोली नंबर 43 हवी आहे , आहे का रिकामी?

मॅनेजर नी हो म्हणताच,साधू महाराज फर्मान सोडतात, "मला एक चाकू, 3 इंच काळा दोरा आणि 80 ग्रॅम वजनाचे एक संत्र ही ताबडतोब पाठवून दे"

मॅनेजर..." हो देतो माझी खोली ही तुमच्या खोलीच्या समोरच आहे , अजून कसली गरज भासली तर मला बेशक सांगा महाराज "

थोड्याच वेळात साधूच्या खोलीतून भयंकर किंचाळण्याचे , वस्तू खाली पडण्याचे , धडाडधुम आवाज येऊ लागतात!!

मॅनेजर बैचेन होऊन अस्वस्थपणे फेऱ्या मारत विचार करू लागतो की आत मध्ये नक्की चाललंय तरी काय ?

दुसऱ्या दिवशी सकाळी तो जेव्हा साधूच्या खोलीत

जाऊन बघतो तेव्हा त्याला आढळून येत की तिथं कोणीही नसून, सगळं सामान मात्रजिथल्या तिथं जागेवर आहे! !

ते पाहून त्याला वाटत कि रात्री आपल्याला भास झाला असावा !
असा विचार करून तो विषय तेथेच डोक्यातून काढून टाकत तो पुन्हा आपल्या कामाला लागतो !

असच एक वर्ष निघून जात,
पुढच्या वर्षी बरोबर त्याच दिवशी त्याच रात्री साधुमहाराज अवतरतात

पुन्हा तोच सवांद , चाकू , काळा धागा , संत्र्यांची मागणी व पुढचा तोच सगळा घटनाक्रम होतो , सकाळी साधू महाराज गायब झालेले असतात!

मॅनेजर हॉटेलच्या सगळ्या स्टाफ ला विचारतो पण कोणाला काहीही माहिती नसत , उलट जाताना त्यांना साधू कडून घसघशीत टीप मिळालेली असते!!!

परत एक वर्ष निघून जात ती रात्र उजाडते ...

त्याच हॉटेलात साधू महाराज अवतीर्ण होतात , रूम नंबर 43 , चाकू , काळा दोरा आणि संत्र्यांची मागणी करतात , ह्यावेळी मात्र मॅनेजर ठरवतो की सगळ्या घटनांवर बारीक लक्ष ठेवायचं!!

दरवर्षी प्रमाणे थोड्यावेळाने साधूच्या खोलीतून किंचाळण्याचे, ओरडण्याचे, वस्तू पडण्याचे आवाज येऊ लागल्याबरोबर मॅनेजर त्याच्या कडच्या मास्टर की ने साधूच्या खोलीचे दार उघडून आत प्रवेश करतो आणि ....

साधूला त्याने विचारतो की हा काय प्रकार आहे?
तुम्ही हे सगळं दरवर्षी ह्याच दिवशी, ह्याच वेळी काय करता , त्यासाठी आमच्याच हॉटेलची निवड का करता!

त्यावर साधू म्हणतो की..

हे मी तुला नक्की संगीन पण..

आधी वचन दे की तू कोणाला सांगणार नाहीस ! इमानदारीत तु हे वचन पाळशील ?

हो दिले वचन कोणालाच नाही सांगणार !

मॅनेजर खरच खूप इमानदार व्यक्ती होती, त्याने साधूला दिलेले वचन कसोशिने पाळले !!!

त्यामुळे ते गुपित गुपित च राहिले!!!

ज्या दिवशी मॅनेजर बेईमान होईल, तेव्हाच आपल्याला ते रहस्य उलगडेल!!
त्या दिवसाची मी ही वाट बघतोय तुम्हीही बघा ...
वाचल्या बद्दल धन्यवाद ! 😜😝🤣🤣🤣

नाहीतरी माझा ही वेळ जात नव्हता , तुमचा तरी कुठे जातोय म्हणा...!!!!
🙊🙉🙈😊

डाळीचे दर वाढल्यामुळे मृत्यू.

नवरा: अगं, आपल्या शेजारच्या वहिनी कशाने गेल्या?

बायको: डाळीच्या किंमती वाढल्यामुळे.

नवरा: काय? वेडबीड लागलंय का तुला?

असं कसं होऊ शकेल? वाट्टेल ते बडबडू नको.

बायको: अहो, मी त्यांचं death certificate माझ्या या डोळ्यांनी पाहिलंय.

नवरा: मग ? काय होतं त्यात ??

बायको: त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं, "Death due to High Pulse Rate". डाळीचे दर वाढल्यामुळे मृत्यू.

नवरा सध्या कोम्यात आहे म्हणे !

All Out !

मोलकरीण: बाईसाहेब तुमच्या मुलानेमच्छर खाल्ले,
बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस
डॉक्टरला बोलाव,
मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण
नाही बाईसाहेब..
मी त्याला All Out पाजले आहे.

बायकोचा वाढदिवस !

बंड्या : तुझा डोळा का सुजलाय रे?



पप्पू : काल माझ्या बायकोचा वाढदिवस होता. मी तिच्यासाठी केक आणला होता.


बंड्या : अरे, त्याचा डोळा सुजण्याशी काय संंबंध?


पप्पू : अरे त्या केकवाल्यानं घोळ घातला. माझ्या बायकोचं नाव तपस्या आहे, त्या मूर्खानं हॅप्पी बर्थ-डे 'समस्या' लिहिलं

लक्षात राहात नाही !!!

विद्यार्थी : सर, मी अभ्यास करतो, पण माझ्या काही लक्षात राहात नाही.

सर : बरं, सांग गेल्यावेळी तू कधी माझ्या हातून मार खाल्ला होता?

विद्यार्थी : मागच्या शुक्रवारी


सर : हे कसं लक्षात आहे?

विद्यार्थी : सर मला प्रॅक्टिकलमध्ये नव्हे, तर थेरीत प्रॉब्लेम आहे.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...