--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

प्रार्थना.

शिक्षक : राजू तु जेवण्यापूर्वी प्रार्थना करतोस का ?
राजू : नाही सर, तशी गरज नसते. माझी आई फार चांगला स्वयंपाक करते.

परंपरा.

शिक्षक : शाम, तु वर्गात फार बोलतोस.
शाम : ती आमची परंपरा आहे.
शिक्षक : याचा अर्थ काय आहे ?
शाम : माझे आजोबा रस्त्यावर फेरीवाले होते, आणि वडिल शिक्षक.
शिक्षक : आणि आई काय करते ?
शाम : ती एक स्त्री आहे.

केशकर्तन.

बॉस : तुम्ही कार्यालयाच्या वेळात केस कापायला गेला होता, तुमच्यावर कारवाई का करण्यात येवू नये ?
बबन : केस पण तर कार्यालयाच्या वेळेतच वाढले होते ना.
बॉस : पण सगळे नाही.
बबन : मी तरी सगळे केस कुठे कापलेत ?

नोटीस.

एकदा माझ्या एका मित्राला आयकर खात्याकडून आयकर कमी भरल्याची दूसरी नोटीस आली. त्याने ताबडतोब पहिल्या नोटीसला उत्तर न दिल्याबद्दल खेद व्यक्त केला व सविस्तर उत्तर लिहून आयकर कार्यालयात गेला.
तेथे संबंधित अधिकार्‍याला भेटल्यावर तो अधिकारी म्हणाला, "फार वाईट वाटून नका घेऊ. आम्ही पहिली नोटीस पाठवलीच नव्हती. आमचा अनुभव असा आहे की दुसरी नोटीसच फार प्रभावकारी असते !!!"

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...