--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

वकिली सल्ला.

शेतकरी : वकिलसाहेब, कोणाची म्हैस माझ्या शेतात शिरली व तिने शेतातले पिक खाल्ले तर मी काय करावं ?
वकिल : तुम्ही त्या म्हशीच्या मालकाला झालेली नुकसान भरपाई मागु शकता.
शेतकरी : द्या तर मला ४०० रुपये. काल राती तुमचीच म्हैस माझ्या शेतात शिरली होती.
वकिल : खर तर तुम्हीच मला १०० रुपये देणे लागता. ५०० रुपये माझा सल्ला घेतल्याचे. त्यातुन तुमचे नुकसान झाल्याचे ४०० रुपये वजा करा व माझे १०० रुपये आणा.

नेपाळी.

एकदा एका नेपाळी माणसावर देव प्रसन्न झाला.
देवाने त्याला ३ ईच्छा विचारल्या.
नेपाळी म्हणाला : १. खुप मोठ्ठा बंगला.
२. त्यात एक खुप श्रीमंत माणुस.
आणि ३. त्या बंगल्याचा गुरखा मला बनव.

घराचा मालक !

एका घरात लिहीले होते, " मी या घराचा मालक आहे, आणि असे घरात लिहायला माझ्या बायकोची परवानगी मी मिळवली आहे."

पाककला !

अहो काल तो भिकारी आला होता ना, मला तो अजिबात आवडला नाही.
कां ? काय केलं त्याने ?
काल मी त्याला चांगल भरपूर खायला दिल, आज तो परत आला व तो मला हे स्वयंपाक चांगला कसा कराव हे पुस्तक देवून गेला.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...