--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

सोपा मार्ग.

दोन भिकार्‍याचा संवाद
पहिला भिकारी : अरे , मी एक पुस्तक लिहिल आहे.
दुसरा : काय नाव आहे त्याच ?
पहिला : सहज पैसा कमावण्याचे सोपे १००१ मार्ग.
दुसरा : तर तु भिक का मागतोस ?
पहिला : तो सर्वात सोपा मार्ग आहे.

तेज !!!

सुनिताला शाळेत नोकरी लागली.
तिने शाळेत कामावर रुजू होण्यापुर्वी एक गॉगल विकत घेतला.
का ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तिने ऎकल होत त्या शाळेत बरेच तेजस्वी मुल आहेत !!!

आत्महत्या.

बांता : सांता, तु हा चाकू उकळत्या पाण्यात का ठेवलाय ?
सांता : मला या चाकूने आत्महत्या करायची आहे.
बांता : तर उकळायची काय गरज आहे ?
सांता : आत्महत्या करताना कोणतेही इन्फेक्शन नको व्हायला ना.

गच्छंती.

मि. देसाई तुम्हाला नोकरिवरुन काढलं जातय. बॉस देसाईला म्हणाला.
पण सर. -देसाई
बॉस : पण काय ?.
देसाई : पण सर, मी काहिही केल नाही.
बॉस : होय खरयं. तुम्हाला काम करण्यासाठी कामावर ठेवलय. त्यामुळे, काहिही काम न करण्यामुळे तुम्हाला कामावरुन काढण्यात आलय !

बदक.

एकदा एका प्राथमिक शाळेत चित्रकलेचा तास होता.
शिक्षीकेने मुलांना छत्री धरलेल्या बदकाचे चित्र रंगवायला दिले.
मुलांना सांगितल की बदकाला पिवळा रंग द्या व त्याच्या छत्रिला निळा रंग द्या.
छोट्या संजयने मात्र बदकाला हिरवा रंग दिला व त्याच्या छत्रिला लाल.
शिक्षीकेने त्याला विचारले अरे तु हिरवा बदक किती वेळा बघितलाय ?
त्यावर छोटा संजय म्हणाला बाई छत्री धरलेला बदक बघितला तितक्याच वेळा.

क्रिकेट.

सांता क्रिकेट खेळायला गेला.
एका स्पर्धेत त्याच्या ३५ धावा झाल्यावर त्याने आपली बॅट उंचावून प्रेक्षकांना नमस्कार केला. त्याच्या या कृतिने सर्वच अवाक झाले.
त्याचा सोबती म्हणाला अरे तुझ्या पन्नास किंवा शंभर धावा झाल्यावर असे करायचे ३५ धावांवर नाही.
यावर सांता म्हणाला," तुला ३५चा महिमा माहित नाही काय ?"
सोबती : नाही.
सांता : मला तर शाळेत असल्या पासुन माहित आहे.
सोबती : तो काय ?
सांता : अरे ३५ गुण मिळाल्यावर आपण पास होतो ना.

गणित.

गुरुजी : बाळू सांग, तुझ्या बाबांकडे १० रुपये आहेत, तु त्यातले ५ रुपये मागितले, तर त्यांच्याकडे किती रुपये शिल्लक रहातील ?
बाळू : सर, १० रुपये.
गुरुजी : तुझ गणित फार कच्च आहे का रे ?
बाळू : नाही सर, तुम्ही माझ्या बाबांना ओळखत नाही.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...