--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

भाडं !

रिक्षावाला मिटरकडे बघुन : साहेब १०० रुपये झालेत.
सांता : हे घे ५० रुपये.
रिक्षावाला : साहेब हे बरोबर नाही. १०० रुपये झाले असतांना तुम्ही मला ५० रुपयेच देत आहात.
सांता : अरे तु पण माझ्या सोबत रिक्षात बसुन आलास नां ?

विमा.

विमा पॉलिसी घेण्यासाठी बरेच फोन आल्यावर सुरेखाबाईंनी एका एजंटला घरी बोलावले.
कोणती पॉलिसी चांगली यावर बरिच चर्चा झाल्यावर सुरेखाबाई एजंटला म्हणाल्या समजा आज मी ह्यांची पॉलिसी घेतली आणि उद्या त्यांचे निधन झाले तर मला काय मिळेल ?
"आजिवन कारावास.", विमा एजंट उत्तरला.

कार बनवणारे वेडे !

सांतासिंग अमॄतसरहून जलंधरला आपल्या मारुती कारने जातो. आईला दोन तासातच पोहचल्याचा फोन करतो व आपल्या कामासाठी जातो.
काम झाल्यावर आईला परत फोन करुन सांगतो मी संध्याकाळ पर्यंत परत येतोय.
रात्र झाली तरी सांता घरी पोहचत नाही.
दुसर्‍या दिवशीही पोहचत नाही.
तिसर्‍या दिवशी दमलेला सांता घरी पोहचल्यावर त्याची आई विचारते," बेटा काय झाल ? तु तर दोन तासातच पोहचला होतास. परत यायला इतका वेळ का लागला ?"
सांता : अग आई हे कार बनवणारे वेडेच आहेत. समोर जायला कारला चार गिअर दिलेत तर मागे जायला फक्त एकच गिअर दिलाय त्यांनी.

कारण.

पहिला : मला स्वयंपाक करायचा, कपडे धुवायचा, घर झाडायचा कंटाळा आला म्हणुन मी लग्न केलं.
दुसरा : मला याच गोष्टींचा कंटाळा आला म्हणुन मी घटस्फोट दिला.

पहिले पाऊल !

धनंजय : अरे संजय आज मी घटस्फोटाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.
संजय : का ? कोणी चांगला वकिल भेटला का ?
धनंजय : नाही, आज माझे लग्न ठरले.

पांढरे कपडे !

नवरा : अग बघ मी माझ्या हातानेच आज कपडे धुतलेत.
बायको : हो का ?
नवरा : बघ ना कसे छान स्वच्छ पांढरे झालेत.
बायको : हो ना तुमचा आवडीचा तो लाल शर्ट पण स्वच्छ पांढरा झालाय.

विजेचा खर्च.

सांता : बांता तु नेहमी TV वर परदेशी चॅनल्सच का बघतोस.
बांता : अरे त्यांचीपण थोडी विज खर्च होऊ दे ना.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...