--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

पहिले पाऊल !

धनंजय : अरे संजय आज मी घटस्फोटाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.
संजय : का ? कोणी चांगला वकिल भेटला का ?
धनंजय : नाही, आज माझे लग्न ठरले.

पांढरे कपडे !

नवरा : अग बघ मी माझ्या हातानेच आज कपडे धुतलेत.
बायको : हो का ?
नवरा : बघ ना कसे छान स्वच्छ पांढरे झालेत.
बायको : हो ना तुमचा आवडीचा तो लाल शर्ट पण स्वच्छ पांढरा झालाय.

विजेचा खर्च.

सांता : बांता तु नेहमी TV वर परदेशी चॅनल्सच का बघतोस.
बांता : अरे त्यांचीपण थोडी विज खर्च होऊ दे ना.

सोनिया गांधी : भारतीयांनो डोळे उघडा.

एका फ्रेंच लेखकाचे सोनिया गांधी बद्दलचे मत.
समस्त कॉंग्रेसी व भारतीय आता तरी जागे होतील हि अपेक्षा.
मूळ लेख वाचण्यासाठी कॄपया या वाख्यावर टिचकी द्या.

सरकार.

काय हो, महाराष्ट्रात सरकार बघितलं कां ?
असे म्हणतात परवा पर्यंत होत, त्यानंतर वादळात उडून गेल.
आज सापडलं माताजींच्या चरणी.
माताजी आता छुमंतर करणार आणि महाराष्ट्रात सरकार परत येणार.
माताजी लय पॉवरबाज आहे म्हणतात.
पॉवरबाज म्हणजे लय पॉवरबाज. त्या पवारला पण पुरून उरल्या.
अस कसं ?
म्हणूनतं त्यांना इंपोर्ट केलंना.
इंपोर्टेडचा शिक्का लागला की भारतात कायबी खपते.

हल्ली पाकिस्तानातुन पण लोकांना इंपोर्ट करतात, काही लोकांना भारताच्या वाढत्या लोकसंख्येवर उपाय
हवा होता. आपले मंत्री जसे कोणत्याही प्रश्नावर परदेशात अभ्यास दौरा करतात तसे ते पण या प्रश्नावर उपाय काढायला दुबईला गेले होते. तेंव्हा त्यांना ते तंत्रज्ञान पाकिस्तान कडे आहे असे कळले.
तेंव्हा पासुन माणसे देवाकडे एक्स्पोर्ट करायला पाकिस्तानी तंत्रज्ञान वापरतात.

तर आपण सरकार बद्दल बोलत होतो. आपल सरकार आता माताजींच्या चरणी आशिर्वादासाठी गेले आहे.
त्यामुळे माणसे देवाकडे एक्स्पोर्ट करणारी आणखी एखादी पाकिस्तानी टीम भारतात आली तर सरकार नसल्याने काय घडेल याचा विचार करायची जबाबदारी आपल्यावर आहे.
तर सांभाळुन रहा................... नाहीतर एक्स्पोर्ट केलं जाईल............. वाचवायला सरकार नाही म्हटलं.

Pakistani Website Hacked.

भारतीय संगणक तज्ञांनी http://pimsat-khi.edu.pk/ ही वेबसाईट हॅक केली आहे.
सर्व संगणक तज्ञांचे अभिनंदन.
पाकिस्तान भारतासोबतचे कोणतेही युद्ध हरणार, त्यामुळे अतिरेकी पाठवण्याचे काम पाकिस्तान करतोय.
वंदे मातरम. जय हिंद.

बायकोचा शोध.

पराग आपल्या मित्राला सांगत होता," अरे, मी ज्या-ज्या मुलीला लग्नासाठी पसंत करतो ती मुलगी आईला आवडत नाही. काय करू कळत नाही."
मित्र : तु तुझ्यासाठी तुझ्या आईसारखीच एखादी मुलगी बघ. ती तुझ्या आईला आवडेल.
पराग काही दिवसांनी : अरे मी अगदी आईसारखीच मुलगी शोधली पण बाबा माझा व तिचापण राग करायला लागलॆ.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...