--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

रामायण.

हवालदार जेलरला : साहेब, काल सगळे कैदी रामायण करत होते.
जेलर : व्वा छान सुधारताहेत तर आपले कैदी.
हवालदार : नाही साहेब.
जेलर : नाही ? काय झाले.
हवालदार : साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता. तो आतापर्यंत परत आलेला नाही.

फोनच बील.

फोनच बील फार जास्त आल्यावर श्री. देसाईंनी सकाळी नाश्त्याला सगळे बसले असताना विषय काढला की फोनच बील एवढ कां ? मी तर सगळे फोन ऑफिस मध्ये असतांनाच करतो. एवढ मोठ बील मला परवडत नाही.
सौ. देसाई : मी पण सगळे फोन माझ्या कार्यालयातुनच करते.
देसाईंचा मुलगा : मी घरुन कधिच फोन करित नाही. कंपनीने मला वेगळा फोन दिला आहे. मी तोच वापरतो.
देसाईंची मोलकरिण : त्यात काय बिघडलं ? आपण सगळेच आपल्या कामाच्या ठिकाणचेच फोन वापरतोनां ?

गाढव.

एकदा एका शाळेतल्या व्रात्य मुलांनी शाळेत काहीतरी मस्ती करायची ठरवले.
बर्‍याच विचारांती त्यांनी तीन गाढव आणले व त्यांच्या पाठीवर १, २ व ४ हे क्रमांक घातले व त्यांना शाळेच्या मैदानात सोडून दिले.
मुख्याधापकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी शाळेतले सर्व कर्मचारी गाढव क्रमांक ३ शोधायला दिवसभर राबवले.

साडी.

बायको : अहो, मला आज पहाटे स्वप्नात दिसल, तुम्ही साडी घ्यायला मला ५००० रुपये दिलेत. पहाटेच स्वप्न खर होणार कां ?
नवरा : होणार ना. ठेव ते ५००० रुपये तुच आणि आण त्याची साडी.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...