--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

रक्तगट !

डॉक्टर : तुमचा आणि तुमच्या बायकोचा रक्तगट एकच दिसतोय.

रुग्ण : हो, का नाही, गेली २५ वर्षे माझ रक्त पितेय !

साम्राज्य.

ईतिहासाच्या वर्गात : मुलांनो आपला मुगल साम्राज्य हा धडा पूर्ण झाला. आता मी तुम्हाला या धड्यावर प्रश्न विचारणार आहे.
राजू तु सांग मुगल साम्राज्य कुठुन कुठपर्यंत होते.
राजू : सर, मुगल साम्राज्य पान क्रमांक १२ ते पान क्रमांक १८ पर्यंत होते.

दारुचा राग.

बायका दारु पिणार्‍या नवर्‍याचा इतका राग का करतात ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण त्यांचा नेहमी घाबरुन उंदरा सारखा रहाणारा नवरा दारु प्यायल्यावर वाघा सारखा वगतो !

आजोबांचं क्रिकेट !

मैदानावर दोन खेळाडू क्रिकेट खेळत असतात.
त्यातला एक आजोबा व दुसरा त्यांचा नातू.
आजोबा नातवाला खेळण्याबाद्दल सूचना देत असतात.
आजोबांच्या एका बॉलला फटकावतांना नातवाने चुक केली. त्यानंतर आजोबा सांगतात, " अरे मी तुझ्या इतका होतोना तेंव्हा मी असा बॉल या झाडावरुन फटकावत होतो."
पुढचा बॉल नातू फटकवायचा प्रयत्न करतो. बॉल काही त्या झाडावरुन जात नाही तेंव्हा आजोबा हसतात व त्याला सांगतात, " अरे मी तुझ्या एतका होतोना तेंव्हा हे झाड खुप लहान होते !"

शोध !

" मी माझी अख्खी हयात या शोधात घालवली." एक वैज्ञानिक सांगत होते.
"तर तुम्हाला या शोधात यश मिळाल कां ?" एक प्रश्न.
"हो ना असे एसिड शोधण्यात मी यशस्वी झालॊ ज्यात काहीही विरघळू शकेल."
प्रश्न," आपल्याला या यशानंतर धन संपत्ती किती मिळाली ?"
"नाही, धन संपत्ती किती मिळेल ठाऊक नाही, सध्या होती ती संपत्ती या एसिडच्या शोधात विरघळून गेली आहे एवढ नक्की !"

बायको हरवली !

कमलाकर (घाईघाईने) : साहेब ! अहो साहेब ! कॄपया माझी तक्रार लिहून घ्या. माझी बायको हरवली आहे.
साहेब : अहो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे पोलीस स्टेशन नाहीये. हे पोस्ट ऑफिस आहे.
कमलाकर : अस्स होय ! काय आहे, आनंदाच्या भरात मला काही सुचतच नाहीये ! कुणाला सांगू अन कुणाला नाही ?


(प्रेषक : राजेश अशोक कोरे, जळगाव. हास्यरंग, लोकसत्ता, रविवार ३ ऑगस्ट २००८)

सल्लागार !

सल्लागार (व्याख्या) : सल्लागार म्हणजे तुमच्या घरात येउन, तुम्ही कसं वागाव याची शिकवणी देणारा व त्याची शिकवणी वसूल करणारा.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...