--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

माफी !

नमस्कार, मी या विमानाचा पायलट बोलतोय. आपण आमच्या कंपनीच्या विमानात मुंबई ते दिल्ली प्रवास करीत असल्याबद्दल धन्यवाद.

आपण सध्या ४०००० फुटांवर असून बाहेरच तापमान -४० अंश आहे. बाहेरचं वातावरण स्वच्छ असुन आपण सुरक्षीत आहोत. अरे SSSSSSS बापरे.............

( विमानात थोड्यावेळ स्मशान शांतता पसरते. काही वेळाने पायलट परत बोलतो. )

माफ करा आपल्याला कदाचित भिती वाटली असेल. पण मला कॉफीचा कप घेत असतांना धक्का लागला व गरम कॉफी पायावर पडली व त्याचा चटका बसला. आपण माझी पॅंट बघू शकता कॉफीने समोर पायावर खराब झाली आहे.

"आपण बघू शकता माझीतर माघून खराब झाली आहे. " एक प्रवासी ओरडला.

हाडाचा कवि.

कविवर्य सोपानदेव चौधरी अन्ननलिकेच्या कॅन्सरने आजारी असतांना त्यांना एका कविसंमेलनाचे आमंत्रण गेले. तेंव्हा सोपानदेवांनी संचालकांना लिहीले ," अंगात रक्त नसल्यामुळे मी विरक्त झालो आहे, अंगावर मास नसल्यामुळे मी आता खराखुरा हाडाचा कवि उरलो आहे. त्यातुन स्ट्रेचर आणि फ्रॅक्चर ह्या चराचरांनी मला व्यापून टाकल्याने मला सोपान चढता येत नाहीत तेंव्हा क्षमा असावी."

करुणास्पद

एकदा वि. स. खांडेकर ना. सि. फडक्यांकडे गेले असताना स्वत:च्या दॄष्टीदोषाच्या गोष्टी सांगू लागले. तेंव्हा फडके त्यांना म्हणाले, " आपण असे करू या. माझे कान गेले, तुमची दॄष्टी गेली, अत्र्यांचे पाय गेले. कोणती आपत्ती जास्त करुणास्पद या विषयावर आपल्या तिघांचा जाहीर परिसंवाद ठेवू. श्रोत्यांची खूप गर्दी होईल नाही का ?"

सरळ वळणाचा !

पु. ल. देशपांडे एका ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आडवळणी व्याख्या आहे."

युक्ती.

एक लहान मुलगा एका घराबाहेर बेल वाजवायचा प्रयत्न करीत होता. काही केल्या त्याचा हात बेलच्या बटन पर्यंत पोहचत नव्हता.

समोरून जाणार्‍या एका माणसाच्या हे लक्षात आले व तो त्या लहान मुलाच्या मदतीला गेला. त्या माणसाने त्या मुलासाठी बेल वाजवली व कौतुकाने त्या मुलाकडे बघितले व म्हणाला, " आता काय ? "

तो मुलगा म्हणाला , " काका कोणी बाहेर येण्यापूर्वी आपण दोघेही पळून जाऊया !!!"

साष्टांग नमस्कार !

आचार्य अत्रे यांच्या "साष्टांग नमस्कार" या नाटकातील एक प्रसंग :
एक पात्रे दुसर्‍या पात्राला म्हणते, " अरे मी पण सिनेमात काम केलंय."
दुसरं पात्र विचारतं, " कोठल्या सिनेमात ? कोणती भूमिका ?"
त्यावर पहिला उत्तरतो, " अलिबाबा आणि चाळीस चोर या चित्रपटात मी एकोणचाळीसाव्या चोराचे काम केले होते,"
दुसरं पात्र विचारतं," पण आम्हाला तुम्ही कसे दिसला नाही ? आम्ही तो सिनेमा पाहिलाय !"
तसं पहिलं पात्र म्हणते," पहिल्यापासून शेवटपर्यंत आम्ही मुळी तेलाच्या बुदल्यातबसून होतो. मग तुम्ही कसे पाहणार ?"

डेंटिस्ट.

आई मी मोठ्ठा झाल्यावर सगळे मला घाबरणार.

आई : का रे तुला काय व्हायचं आहे ? बॉक्सर कि कुणी पैलवान ?

नाही गं आई मला डेंटिस्ट व्हायचे आहे.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...