--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

डॉक्टर.

डॉक्टर आपल्या मित्राला, " तुला खरं सांगतो मी या उगाचच करण्यात येणार्‍या शस्त्रक्रियेच्या विरोधात आहे. मी यांच समर्थन कधिच करु शकणार नाही."

मित्र, " तर तु शस्त्रक्रियेचा निर्णय कधि घेतोस"

डॉक्टर, " मला जेंव्हा जेंव्हा पैशाची गरज भासते !"

मासेमार.

एकदा सरदार सांतासिंग व त्याचे दोन मित्र रस्त्याच्या कडेला एका दगडावर बसले होते. सांतासिंग मधे बसून पेपर वाचत होता तर त्याचे मित्र त्याच्या दोन्ही बाजूला बसून मासे पकडण्यासाठी गळ टाकून बसले होते.
त्यांचे हे वेडेचाळे येणारे-जाणारे बघत होते व हसत होते. काही वेळाने गर्दी बरिच वाढली.
गर्दी बघुन एक हवालदार तेथे आला व मासे पकडणार्‍या एकाला दरडावून विचारले, " काय करताय ?"
तो म्हणाला," मासे पकडतोय."
हवालदार भडकला व त्याने सांतासिंगला विचारले हे काय करताहेत ?
सांतासिंग म्हणाला ते मासे पकडताहेत.
हवालदाराने काठी उगारली व विचारले हि काय मासे पकडायची जागा आहे कां ?
काठी उगारलेली बघताच सांतासिंग बोट वल्हवल्यासारखे करू लागला.

माशी.

डॉक्टर, डॉक्टर मला वाटते मी माशी झालोय.

डॉक्टर : मला वाटते, तुम्हाला डॉक्टर नाही तर मानसोपचाराची गरज आहे. तुम्ही मानसोपचार तज्ञाकडे जा.

पेशंट : हो डॉक्टर मी त्यांच्याचकडे निघालो होतो. पण तुमच्याकडे दिव्याचा उजेड दिसला अन इकडे वळलो.

गुप्तहेर.

"काय हो, तुम्ही पोलीस कां ? " एक माणूस पोलीसाच्या गणवेशातल्या माणसाला
"नाही, मी गुप्तहेर आहे."
"मग तुम्ही हा गणवेश का घातला आहे"
"आज मी रजेवर आहे !"

प्लॅटफॉर्म तिकीट.

श्री देसाई त्यांच्या हट्टी, हेकेखोर व मुर्खपणा साठी प्रसिद्ध. तसेच त्यांना त्यांच्या पैशाचा फार दुराभिमान.
एकदा ते एका नातेवाईकाला रेल्वे स्टेशनवर सोडायला गेले, अर्थातच गरज होती प्लॅटफॉर्म तिकीटाची.
ते तिकीट खिडकीवर गेले व कारकूनाला फर्स्ट क्लासचे प्लॅटफॉर्म तिकीट मागितले. कारकूनाने असे तिकीट मिळत नसल्याचे सांगूनही श्री देसाईंना ते पटेना.
तेंव्हा स्टेशन मास्तरला भेटून त्यांनी रेल्वे मंत्रालयाला तसे तिकीट उपलब्ध व्हावे यासाठी पत्र लिहीण्यास सांगीतले व ते स्वत:ही त्या प्रयत्नात आहेत !

बॉस

बॉसच्या सवयीला कंटाळलेल्या एकाने त्याच्या बॉसला पाठविलेलं एक पत्र.

प्रिय बॉस,

आपण या कार्यालयात आल्यापासुन कामाची मजा लूटण्याचा प्रसंग आमच्यावर वारंवार येत आहे याबद्दल धन्यवाद.

दिवसभर गप्पा झाल्यावर आपण बरोबर ४.३० वाजता बोलावून घरी जाण्यापूर्वी जे काम पूर्ण करुन जा असे सांगता ते आम्हा सर्वांना फार्फार आवडते. आपण ही सवय कायम ठेवावी हि विनंती.

जाण्यापूर्वी तासाभरात काम पूर्ण करायचे चॅलेंज रोजच स्विकारण्याने आमची ताकद वाढत चालली आहे व यासाठी आपले आभार कसे मानावे कळत नाही.

तरी आपण असेच दिवसभर वाट्टेल त्या गप्पा करुन ४.३०ला काम देत जावे हि परत एकदा सर्वांतर्फे विनंती.

आपला,

बाळू.

बाळूचे गणित.

शिक्षक : बाळू समजा मी तुला दोन ससे दिलेत आणखी दोन ससे आणखी दोन ससे दिलेत तर तुझ्याकडे एकूण किती ससे झालेत ?

बाळू : सात.

शिक्षक : परत ऎक, समजा मी तुला दोन ससे दिलेत आणखी दोन ससे आणखी दोन ससे दिलेत तर तुझ्याकडे एकूण किती ससे झालेत ?

बाळू : सात.

शिक्षक : आपण उदाहरण बदलु या. समजा मी तुला दोन संत्री दिलीत आणखी दोन संत्री आणखी दोन संत्री दिलीत तर तुझ्याकडे एकूण किती संत्री झालीत ?

बाळू : सहा.

शिक्षक : शाब्बास, संत्री सहा तर तुझ्याकडे ससे कसे सात होणार ?

बाळू : माझ्याकडे अगोदरच एक ससा आहे नां !

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...