--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

ट्रक.



घराबाहेर ट्रक उभा राहिल्यावर तो फारच घाबरला.


त्याच्या मित्राने विचारले, " काय झालं, ट्रक आल्यावर तु इतका कां घाबरलास ?


तो म्हणाला," अरे काय सांगू, एकदा असाच एक ट्रक आला व त्यांनी माझ्या बायकोला पळवले. मी घाबरलो कारण मला वाटले ते तिला परत सोडायला आलेत कि काय !"

माणूसकी

एक चोर, चोरी करायला एका घरात शिरला.

घरात शोधाशोध केल्यावर त्याला तिजोरी सापडली.

तो ती तिजोरी फोडणार, तितक्यात त्याला तेथे एक सुचना दिसली.

"तिजोरी फोडायची गरज नाही. तिजोरी उघडायला ८९६६ डायल करा आणि बाजूची बटन दाबा"

चोर खुष झाला व त्याने ८९६६ डायल करुन बाजूची बटन दाबली. तिजोरी उघडली नाही पण थोड्यावेळात पोलीस तेथे हजर झाले.

पोलीस पकडून नेत असतांना तो चोर हताशपणे म्हणाला," आज माझा माणूसकी वरचाही विश्वास उडाला"

शुभेच्छा.

यशाची गुढी उंच जाऊ दे !
माझ्या सर्व वाचकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नविन वर्ष आपणा सर्वांना सर्वोत्तम यश, संपदा व आरोग्य घेवून येवो,
आपल्या चेहर्‍यावरील हास्य कायम राहो हिच ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना.

पैसा.

एकदा सुप्रसिध्द विनोदी लेखक कै. चिं. विं. जोशी आपल्या मित्रासोबत कोठेतरी जात होते. त्यांनी समोरुन पै आडनावाचे आई-बाप व मुलगा असे तिघे येताना बघितले. तेंव्हा आपल्या मित्राला म्हणाले बघ पैसा येत आहे. तिन पै म्हणजे एक पैसा नां ?

गाढव

स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानबध्दतेतून सुटल्यावर त्यांचे दौरे सुरु झाले. त्यामुळे कॉग्रेसवाले मत्सराने खदखदू लागले. त्यापैकी एक प्रसिध्द गांधीवादी श्री. जाजू म्हणाले," सावरकर सोलापूरला आले तर आम्ही त्यांची गाढवावरुन मिरवणूक काढू !"
हे वृत्त आचार्य अत्रे यांना कळले. दुसर्‍या दिवशी ते पुण्यातील एका सभेत उत्तरले ," लोकहो, तो गाढव आपणास शोधावयास नको, आपण वीर सावरकरांना जाजूंच्याच खांद्यावर बसवू म्हणजे झाले !"

साखरेचा भाव.

एका बाईंना तातडीने साखर हवी होती.
त्या मगनलालच्या दुकानात गेल्या. दुकानावर पाटी होती "साखर १५ रु. किलो".
बाई मगनलालला म्हणाल्या दोन किलो साखर द्या.
मगनलाल, " बाई साखर संपली आहे, उद्या घेवून जा."
बाई जवळ्च्याच छगनलालच्या दुकानात गेल्या. तेथे साखर २० रु. किलो अशी पाटी होती.
बाई, " काहो, त्या मगनलालच्या दुकानात तर साखर १५ रु. किलो आहे, तुम्ही कसे २० रु. किलो देता ?"
छगनलाल, " बाई साखर २० रु. किलो आहे. संपल्यावर मी पण १५ रु. किलोची पाटी लावणार आहे !"

इंग्रजीचे शिक्षण.

एकदा माजी पंतप्रधान स्व. श्री. राजीव गांधी हे लोकसभेत आणीबाणी का लावता येणार नाही याचे इंग्रजीतून विश्लेषण करीत होते. या दरम्यान स्व. श्री. मधू दंडवते यांना म्हणाले, "दंडवते, आपल्याला इंग्रजी समजत नसेल तर मी काय करू ?"
राजीव गांधी यांच्या अशा खोचक वाक्याला दंडवते यांनीही तशाच झणझणीत शब्दात उत्तर दिले. ते म्हणाले, " मी प्राध्यापकाकडून इंग्रजीचे शिक्षण घेतले आहे, हवाई सुंदरीकडून नव्हे."

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...