--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

इंग्रजीचे शिक्षण.

एकदा माजी पंतप्रधान स्व. श्री. राजीव गांधी हे लोकसभेत आणीबाणी का लावता येणार नाही याचे इंग्रजीतून विश्लेषण करीत होते. या दरम्यान स्व. श्री. मधू दंडवते यांना म्हणाले, "दंडवते, आपल्याला इंग्रजी समजत नसेल तर मी काय करू ?"
राजीव गांधी यांच्या अशा खोचक वाक्याला दंडवते यांनीही तशाच झणझणीत शब्दात उत्तर दिले. ते म्हणाले, " मी प्राध्यापकाकडून इंग्रजीचे शिक्षण घेतले आहे, हवाई सुंदरीकडून नव्हे."

दुसर्‍या प्रयोगाचे तिकीट.

एकदा जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी चर्चिल यांना आपल्या नव्या नाटकाची दोन तिकीटे पाठविली आणि सोबत एक पत्र लिहीले, " सोबत पाठविलेल्या दोन तिकीटांपैकी एक तुमच्या साठी आहे आणि दुसरे तुमच्या मित्रासाठी, जर एखादा असेल तर !"
चर्चिल यांनी त्या पत्राला उत्तर पाठविले, " या पहिल्या प्रयोगाला मला येता येणार नाही. दुसर्‍या प्रयोगाची दोन तिकीटे पाठवा. जर होणार असेल तर !"

अंतरीक्ष प्रवास.

एकदा कवि सोपानदेव चौधरी रिक्षातून जात असताना, खराब रस्त्यामुळे त्यांचे डोके रिक्षाच्या छताला लागत होते. तेंव्हा ते रिक्षावाल्याला म्हणाले,"अरे, मी रिक्षात बसलेला खरा पण मला अंतरिक्षात पोचवू नकोस !"

शेंडी.

एका कार्यक्रमाला आचार्य अत्रे हजर होते. त्यांच्या अगोदरचे सनातनी गृहस्थ आपल्या भाषणात म्हणाले,"आम्ही शेंडी का ठेवतो, त्याला शास्त्रीय कारण आहे. आमच्या पुर्वजांना माहीत होते की शेंडीत विज असते."
त्यांच्यानंतर आचार्य अत्रे बोलायला उभे राहिले व म्हणाले,"शेंडीत विज असते हे कदाचित कुणाला माहीत नसेल. पण मला तसा अनुभव आलाय. मी कॉलेजला गेल्यावर शेंडी काढली आणि माझ्या वडिलांना चांगलाच धक्का बसला !"

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...