--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

पुस्तक.

एक माणूस लायब्ररियनला : मला आत्महत्या कशी करावी या विषयावरच एखादं पुस्तक द्यालं कां ?

लायब्ररियन : नाही, तुम्ही मला ते परत करु शकणार नाही.

चिंता.

धनंजयच्या समोर नविन वर्षाचे कॅलेन्डर होते व तो ऑफिस मध्ये डोक्यावर हात ठेवून बसला होता.
"का रे सकाळी सकाळी काय झालं, डोक्यावर हात ठेवून बसायला ?" एक सोबती म्हणाला.
धनंजय," काही नाही रे, या वर्षीच्या सुट्या बघत होतो. या कॅलेंडर वाल्यांनी फार कमी छापल्या आहेत, आणि बर्‍याच रविवारीही ! "

वेड.

एका दारुड्याने मित्राला विचारले, "किती वाजले ?"
मित्र म्हणाला,"बारा"
दारुडा :-"अरे आज मला बहुतेक वेड लागणार आहे."
मित्र :-"का रे काय झाले?"
दारुडा :-" दिवसभरात मी कितीतरी जणांना हाच प्रश्न विचारला पण प्रत्येकाने मला वेगवेगळे उत्तर दिले."

शोध.

महेश फार डोकेबाज होता. त्याने एकदा वर्तमान पत्रात आपल्या अजब शोधाबद्दल जाहीरात दिली," पेन व शाईशिवाय कसे लिहावे. अधिक माहितीसाठी एक रुपया पाठवा.
हजारो लोकांनी महेशला एक एक रुपया पाठवला. महेशने त्या सर्वांना उलट टपाली कार्ड पाठवून सांगीतले,"वेड्यांनो पेंसिलने लिहा, पेन्सिल वापरत जा".

एका दगडात....

रामभाऊ आजारी होते. डॉक्टरांना न बोलावताही डॉक्टर घरी आलेले पाहुन सगळे चकित झाले.
वहिनींनी डॉक्टरांना विचारले, " इकडे कसे काय येणे केले".
डॉक्टर म्हणाले, " जवळच आणखी एक पेशंट बघायला आलो होतो, म्हटलं, एका दगडात दोन पक्षी मारावेत".

आराम !

बांधकाम मजुर मुकादमाला : "माझं फावडं मिळत नाही, कदाचित चोरीला गेलं असावं".
मुकादम : हरकत नाही, तर तु आज आराम कर.
मजुर तरीही हलेना.
मुकादम : काय झालं ?
मजुर : " फावड्या शिवाय आराम कसा करू ? त्याला टेकूनच तर आम्ही सगळे आराम करतो !"

थंडी.

एक पाकिटमार चालत्या बसमध्ये एका प्रवाशाला म्हणाला, " वैताग आणलाय या थंडीनं"
प्रवाशाने विचारले, "का रे ? काय झालं ?"
पाकिटमार वैतागल्या स्वरात म्हणाला, " सारे लोक खिशातच हात घालून बसतात ना !"

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...