--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

वाहने हळू चालवा.

स्कूटरस्वार : हवालदारसाहेब, इथे वाहने हळू चालवा असे का बरं लिहीलंय.
ट्रॅफिक हवालदार : "कारण आजुबाजूला हॉस्पिटल नाही आणि इथे रूग्ण्वाहिकेची सोय नाही.

हुशार आजोबा !!!

एक आजोबा रिक्षावाल्याला : बेटा, रेल्वेस्टेशन पर्यंत जायचे किती पैसे घेणार ?
रिक्षवाला : दहा रूपये.
आजोबा : आणि माझ्या सामानाचे ?
रिक्षावाला : सामानाला काही पैसे लागत नाही आजोबा.
आजोबा : बरं, मग तु सामान घेऊन पुढे जा. मी मागुन चालत येतो.

परिक्षा.

परिक्षेच्या वेळी एक मुलगा उत्तरपत्रिकेत काहीच न लिहीता विचार करीत बसला होता.
तेंव्हा सुपेरव्हायझरने विचारले," काय रे, कसला विचार करतो आहेस ? पेपर फार कठीण आहे कां?
मुलगा उत्तरला, " तसं नाही हो, कोणत्या खिशात कुठल्या प्रश्नाच उत्तर आहे त्याचा विचार करतोय.

श्वास.

"जगातील मरणाचे प्रमाण" हा विषय गुरूजी शिकवत असतात.
गुरूजी : मुलांनो, माझ्या प्रत्येक श्वासागणिक या जगात एक माणूस मरतो.
गण्या : गुरूजी, पण मग तुम्ही श्वासच कशाला घेता ?

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...