--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

सज्जन पती

शिला मिनाला : माझे पती येवढे सज्जन आहेत की ते परस्त्री कडे आजिबात बघत नाहीत

मिना : माझे पती तर 4 पावले पुढे आहेत की ते माझ्या कडे पण बघत नाहीत.

फरक !

बायको नवऱ्याला : तुम्हाला झाडावर चढता येते का ?

नवरा : नाही . 

बायको : तुमच्यापेक्षा  माकड बरा . 

नवरा बिचारा कसा बसा २ महिन्यात झाडावर चढायला शिकतो . 

नवरा बायकोला : हे बघ मी झाडावर चढू शकतो . 

बायको : तुमच्यात आणी माकडात काय फरक राहिला !!!

स्वर्ग

पत्नी पतीला : असं ऐकले आहे की स्वर्गात पती पत्नीला एकत्र राहू देत नाहीत

पती : अगं वेडे म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात !

एक यशस्वी नवरा ...

लोक आपल्या बायकांना इतके का घाबरतात, काही समजतच नाही…

मी मात्र याला अपवाद आहे. माझ्या घरचा मी राजा आहे.

जेव्हा मला थंड पाण्याने भांडी धुवायचा मूड असतो, तेव्हा मी थंड पाण्याने धुतो, जेव्हा गरम पाण्याने धुवायचा मुड असतो, तेव्हा गरम पाण्याने धुतो.

याबाबतीत मी इतर कोणाचंच ऐकत नाही।।।

लादी पुसताना फिनाईल घ्यायचं की लायझोल,

माझं मीच ठरवतो…

एक शब्द बोलायची बायकोची हिम्मत नसते…

सकाळचा चहा बनवून बायकोला जागं केल्यावर, चहा बेडवरच प्यायचा, की ड्रॉईंग रूम मध्ये प्यायचा की बाल्कनीत बसून प्यायचा, निर्णय माझाच असतो. काय हिम्मत आहे ती लुडबुड करेल…

कपडे सर्फ एक्सेलने धुवायचे की टाईड ने, तिथेही माझंच राज्य चालतं…

याबाबतीत तर मी बायकोला इतकं अज्ञानी करून ठेवलंय की तिला अजून वॉशिंग मशीन कशी चालवावी, हेही माहीत नाही…

कोणत्या झाडूनं घर झाडायचं, हा निर्णय दस्तुरखुद्द आम्हीच घेतो.

जेवायला काय बनवायचे हे बायको कोण सांगणार? माझ्या इच्छेनुसार मीच तिला विचारून बनवतो…

काच ओल्या फडक्याने पुसायची की कोलीन शिंपडून, चर्चा होतंच नाही…

रविवारी शौचालय सकाळी स्वच्छ करायचं कि संध्याकाळी, हे देखील मीच ठरवतो…

आणि सर्वात महत्वाचं ...

रात्री झोपण्यापूर्वी तिचं डोकं आधी चेपायचं की पाय, निर्णय माझाच असतो…

मी on the spot निर्णय घेतो.

अरे बाबांनो, घरातील सर्व मोठे निर्णय घेता येणं, यात तर खरी पुरुषाची शान आहे!

पण तुम्ही निराश होऊ नका. माझा हेतू तुम्हाला जळवायचा किंवा तुमचं मनोबल खच्ची करण्याचा नाही…

एक यशस्वी नवरा ...

Missed Call

पोरींनी Missed Call ला इतकं बदनाम केलं आहे की,.
.
.
चुकून कधी मित्राचा Missed Call आला तरी आई म्हणते…..

जा बघ….तुझी राणी तुझी आठवण काढतेय

चष्मा

डॉक्टर : चष्मा कोणासाठी बनवायचा?

बबलू :  माझ्या  शिक्षकांसाठी 

डॉक्टर : पण का?

बबलू- कारण ते माझ्याकडे बघून मला गाढव म्हणतात  !

X

गणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्याडब्यात चपाती बुडवून खात होते...

मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात तर काहीच नाही...

गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला 'एक्स' मानल आहे..!

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...