--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

कामचोर बायको

घटस्फोटाच्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू असते…



वकील : एवढं काय झालं की मधुचंद्राच्या रात्रीच तुम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला?


नवरा : मी तिला लाडानं म्हटलं, जरा चेहऱ्यावरचा पदर बाजूला कर… तर ती म्हणाली तुम्हीच करा…


तेव्हाच समजलं की ही बाई एक नंबरची कामचोर आहे…

मूड

मन्या : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना आणि आज एकदम मूडमध्ये ?

गणु: काल यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत.

मनू: मग आज मूड ऑन कसा ?

गणू: आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय. 😀

पुणेरी आजोबा !

एक आजोबा स्वारगेट स्टँडला रिक्षात बसतात. काही वेळाने घराजवळील वडाच्या झाडा शेजारी रिक्षा थांबवतात.

आजोबा — किती झाले ?

रिक्षावाला —42 रुपये. (आजोबा 50 की नोट देतात)

रिक्षावाला —आठ रुपये सुट्टी नाहीये

आजोबा —ठीक आहे , जोपर्यंत मीटर मध्ये पन्नास होत नाहीत तोपर्यंत वडाच्या झाडाभोवती गोल गोल फिरव…

रिक्षावाला मुकाट्याने सुट्टे पैसे देतो…!

( काही लोक परफेक्ट होण्यासाठी आयुष्यभर झटतात …तर काही लोक थेट पुण्यातच जन्म घेतात….)

बॅटरी

मित्र :- एवढ्या उशीर पर्यंत ऑनलाईन काय करतोय….?
मी :- वाट बघतोय….?
मित्र :- कश्याची….?
मी :- बॅटरी लो होण्याची….!

रिव्हेंज मॅरेज..!!!

मोहितेंना त्याचा बालपणीचा मित्र अनेक वर्षांनंतर भेटला.



वहीनींशी ओळख वगैरे झाल्यानंतर मित्राने विचारले, 🤔

“तुमचे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ..?"

मोहिते  म्हणाले, “आमचे रिव्हेंज मॅरेज..!!!”



मित्र: (आश्चर्याने)🤔 "रिव्हेंज मॅरेज ? हे काय नवीन?"

मोहिते  : "एकदा मी बसने जात होतो, ही माझ्याकडे येऊन म्हणाली,

"ओ मिस्टर उठा ! ही सीट स्त्रियांसाठी राखीव आहे."

मग मी म्हणालो “अहो मग काय झाले ? मी पण स्त्रियांसाठीच राखीव आहे ..!


‘मिस्टर’ म्हणतेस आणि अशी चिडतेस कशाला...!”


बस मध्ये एकच हशा पिकला!😂😂😂


मित्र : "मग काय झाले?”


मोहिते  : "मग काय, ही संतापून म्हणाली, “याचा सूड घेईन..!”

आणि...

तिने माझ्याशी लग्न केले !!"

वेडेपणा.....

 Internet ने लोक एवढे वेडे झालेत की…


काल मेडीकल स्टोअर  मध्ये एक जण  500 mg च्या गोळी ऐवजी 500 MB ची गोळी मागत होता..

महत्वाचा प्रश्न !

लग्न झालेल्यांसाठी एक प्रश्न:

उत्तर फक्त हो किंवा

नाही मध्ये द्यावे,

आता तुमच्या बायकोने तुम्हाला

मारणे बंद केले आहे का ?

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...