--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

आता मोबाईलवर.

आपला आवडता ब्लॉग आता मोबाईलवरही वाचता येणार !

आपला आवडता ब्लॉग "सर्वोत्तम मराठी विनोद" आता कोणत्याही मोबाईलवर  वाचता येणार. संगणक आपल्या जवळ नसल्यास आपल्या मोबाईलवर Opera  हा Browser Install करा व सर्वोत्तम विनोदांचा आनंद घ्या !

लाईट !!!

सर - homework का नाही केला?

मुलगा - सर लाईट गेले होते.

सर - मेणबत्ती लावायची मग..

मुलगा - काडेपेटी नव्हती.

सर - का?

मुलगा - देवघरात होती.

सर - घ्यायची मग.

मुलगा - अंघोळ नव्हती केली.

सर - का?

मुलगा - पाणी नव्हत.

सर - का?

मुलगा - मोटार चालू होत नव्हती.

सर - का?

मुलगा - आधीच सांगितलं ना लाईट गेलेली म्हणून....

पत्ता !

झम्प्या एका सुंदर मुलीला विचारतो तुम्ही कुठे राहता?


मुलगी : एम. जी. रोड


झम्प्या : एवढ्या सुंदर असून तुम्ही रस्त्यावर राहता......!!!

१ रुपया कुठे गेला ?

विनोद खुप झाले. आज चला डोक चालवूया !
 
 
 
३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले.

बिल आले ७५ रुपये.

तिघांनी २५ ,२५, २५ रुपये काढून वेटर ला दिले.

मॅनेजर ने ५ रुपये कन्सेशन देऊन त्यांना परत दिले.

 ...वेटर ने २ रुपये स्वताला ठेऊन , तिघांना १, १, १ रुपया परत दिला.

... म्हणजे प्रत्येकाला २४ रुपये पडले
मग २४ + २४ + २४ = ७२+ वेटरचे २ = ७४
मग १ रुपया कुठे गेला ????

कोलंबसची मराठी बायको !

जर कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला


नसता... कारण बायकोने विचारले असते...

कुठे चाललात?

कोणा बरोबर?

कसे जाणार?

... काय शोधायला जाताय?

इकडे मिळणार नाही का?

नेहमी तुम्हीच का?

मी इथे एकटी काय करू?

मी पण येऊ का?



कोलंबस: जाउ दे नाही जात...
 
(फेसबुकवर हे पोस्ट करणार्‍या मित्राचे आभार. मूळ लेखक माहित नाही.)

वय ?

जनगणने साठी प्रगणक घरी आल्यावर सुरेखाबाईंनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पण स्वत:चे वय काही केल्या सांगेनात.
तेंव्हा प्रगणक म्हणाला," अहो बाई असे काय करता. तुम्हाला तुमचे वय सांगावेच लागेल."

सुरेखाबाई," त्या शेजारच्या कावळे बाईनी आपले वय सांगीतले का ?"

प्रगणक," होय."

सुरेखाबाई,"तर लिहून टाका ना तेवढेच."

आणि प्रगणकाने सुरेखाबाईंचे वय लिहीले "कावळ्या ईतके "

जाहिरात !

बळवंतराव एक दिवस अचानकच गेले.
त्यांच्या बायकोने पेपरला फोन करुन ते गेल्याची जाहिरात द्यायची ठरवले.
त्यांनी पेपरला फोन करुन सांगितले," जाहिरातीत छापा "बळवंतराव आज सकाळी अचानक गेले."
पलिकडुन जाहिरात घेणारा म्हणाला अहो, तुमचे शब्द फारच कमी होतात. अजुन काही शब्द वाढवा.
बायको म्हणाली, तर छापा,"बळवंतराव आज सकाळी अचानक गेले. त्यांची सायकल विकायची आहे."

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...