--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

तपासणी !

एकदा एक शेतकरी आपले शेत नांगरत होता.
त्याच्या शेताजवळ एक मोटार थांबली व त्यातुन एक माणूस उतरला. तो माणूस शेतकर्‍याच्या दिशेने चालत आला व म्हणाला मला तुमच्या शेताची व झोपडीची तपासणी करायची आहे.

शेतकर्‍याने त्याला परवानगी दिली व म्हणाला साहेब शेताच्या त्या दिशेला जाऊ नका.

मला सांगू नका, माझ्याकडे तुमचे शेत तपासायचे पत्र आहे.


शेतकर्‍याचे सांगणे न ऎकता तो माणूस शेतकर्‍याने सांगीतले त्याच दिशेला जाऊ लागला.

थोड्यावेळाने त्या दिशेकडून किंचाळ्या ऎकू येऊ लागल्या व तो माणूस बाहेर जायचा रस्ता शोधत होता.

त्याच्या कडे बघत शेतकरी ओरडला," माझ्या बैलाला दाखवा ते पत्र."

सिनेमा.

कायमच खेड्यात राहिलेले छगनराव एकदा शहरात आले.
घरी सर्वांनी एक सिनेमा बघायच ठरवल.
सिनेमा सुरु झाला, सर्वच मजा घेत होते.




आणि



सिनेमात एक वाघ प्रेक्षकांच्या दिशेने येत आहे असा सीन आला.
वाघ प्रेक्षकांकडे येत आहे हे बघुन छगनराव जोरजोरात किंचाळायला लागले.
छगनरावांना सांगण्यात आल घाबरु नका हा सिनेमा आहे.

छगनराव म्हणाले," होय, मला माहित आहे. पण त्या वाघाला माहित आहे का ?"

धाड.

काल, एका माणसाने दोन किलो कांदे आणले.

आज : त्याच्या घरावर आयकर अधिकार्‍यांनी धाड घातली. इतके पैसे कुठून आणले हे बघायला !

काळ.

आम्ही जेंव्हा लहान होतो तेंव्हा आम्हाला मोठ्यांचा आदर करण्यास सांगण्यात आले.

आता मोठे झाल्यावर आम्हाला तरुणांच ऎकाव अस सांगतात.

याला म्हणतात नशिब.

देवाची देणगी.

एकदा ब्रम्हदेव आपल्या सर्व दूतांना व कर्मचार्‍यांना एका बैठकित सांगत होते," हे बघा, आपल्याला काही चांगले निर्माण करायचे असेल तर तेथेच काहीतरी वाईट पण द्यावे. म्हणजे त्या क्षेत्रात संतुलन कायम रहाते. सर्व कामे अशी करायची कि कोठेही संतुलन बिघडता कामा नये.
थोडे थांबुन देव म्हणाले," कुणाला काही अडचण ? माझे म्हणणे कुणाला कळले नसेल तर विचारा मी माझ्या म्हणण्य़ाचे स्पष्टीकरण द्यायला तयार आहे."
काही वेळाने एक देवदूत ऊभा राहिला व देवाला म्हणाला,"देवा आपले म्हणणे कळले पण आपण एखादे उदाहरण द्याल का ?"
ब्रम्हदेव म्हणाले," हे बघा मी अमेरिकेला सर्व काही दिले आहे. तेथील लोकांना मी भरभरुन श्रीमंती दिली, मजा करायला बरिच ठिकाणे दिली पण त्यांना भितीही दिली.  त्यांना कायम भिती वाटत असते."
दूसरा देवदूत म्हणाला, " देवा अजुन एक उदाहरण द्याना."
ब्रम्हदेव म्हणाले," मी अफ्रिकेला निसर्गाचे दान भरभरुन दिले पण त्यासोबतच गरिबीही दिली."
तर तिसरा देवदूत म्हणाला," देवा तुम्ही म्हणता ते बरोबर नाही, आपण सर्वच ठिकाणी असे संतुलन सांभाळत नाही. आता बघाना भारताला निसर्गाचे दान दिले, समॄद्धि दिली, श्रीमंती दिली व कुठेच काही कमी दिसत नाही."
देव म्हणाले," होय तेथेही मी संतुलन कायम राखले आहे. त्यांना शेजारी मी पाकिस्तान दिलाय ना."

सुखी जीवनाचे रहस्य !

रामभाऊ  आणि वत्सलाबाईंच्या लग्नाचा साठावा वाढदिवस साजरा करायला सर्व जमले होते. दोघेही आनंदात होते. सर्व भेटणारे त्यांच्या सुखी जीवनाच कौतुक करत होते.
रामभाऊचे जुने मित्र मनोहरपंत हा कौतुक सोहळा, कोर्‍यात बसुन बघत होते.
एका क्षणी मनोहरपंतांना वाटले सर्वांसमक्ष त्यांना या सुखी जीवनाचे रहस्य विचारावे आणि त्यांनी माईक हाती घेऊन रामभाऊंना विचारले,"रामभाऊ, मी तुम्हाला बरिच वर्षे ऒळखतोय पण तुमचे व वहिनींचे मी कधि भांडण बघितले नाही, याचे रहस्य सांगाल का ?"
रामभाऊ," आमच्या लग्नाच्या दिवशीच आम्ही ठरवले होते, सर्व लहान निर्णय हिने घ्यायचे व सर्व मोठ्ठे निर्णय मी घ्यायचे. आणि आम्हाला कधिही मोठा निर्णय घ्यायची वेळ नाही आली !"

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...