--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

कर्ज !

एका माणसाने कार घेण्यासाठी कर्ज घेतल.
ते कर्ज तो फेडू न शकल्याने बॅंकेचे अधिकारी ती कार घेऊन गेले.
यावर तो माणूस म्हणाला,"मला माहीत नव्हत, नाही तर मी लग्नासाठी पण कर्ज घेतल असतं."

श्रेय !

मुलाकातकार : तुम्ही कोट्याधिश झालात या यशाच श्रेय कोणाला द्याल ?
कोट्याधिश : मी माझ्या सर्वच बाबतीतल श्रेय माझ्या पत्निला देतो. मी आज जे काही आहे ते तिच्या मुळेच.
मुलाकातकार : तर तुमची बायको फारच कर्तुत्ववान आहे. तुम्ही लग्नापुर्वी काय होता ?
कोट्याधिश : अब्जाधिश.

संकट.

ती : ऑफिसला जाताना तुम्ही माझा फोटो आपल्या पाकिटात का ठेवता ?
तो : अग त्यामुळे माझी संकटं लगेच सुटतात.
ती : कस कायं ?
तो : अगं, कोणतही संकट आलं किंवा कठिण काम आल की मी पाकिटातुन तुझा फोटो काढुन त्याकडे बघतो, त्यामुळे तुझ्यापुढे कोणतेही संकट हल्क वाटयला लागते !!!

पर्याय.

एकदा एका खिसेकापूला कोर्टात हजर करण्यात आले.
न्यायाधीशांनी त्याला सहा महिने जेल किंवा दोन हजार रुपये दंड ठोठावला. तेंव्हा खिसेकापू चोराचा वकिल म्हणाला, "साहेब, माझ्या अशिलाला दंड भरायचा आहे, पण त्याच्याकडे फक्त एक हजार रुपयेच आहेत. तुमची परवानगी असेल तर तो या गर्दीत दहा मिनीटे फिरुन अजुन एक हजार रुपये आणु शकेल."

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...