--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

चंद्रावर स्पर्धा !

राधिका : बाबा, १५ ऑगस्टला आमच्या शाळेने नारळी पौर्णिमा असल्या मूळे चंद्रावर स्पर्धा ठेवली आहे आणि मी त्यात भाग घेतला आहे क्विझ मध्ये.
छोटा राहूल : बाबा बाबा, तुम्ही जाउ द्याल दिदिला चंद्रावर ?

नरक.

मॄत्युनंतर एका इंजिनीयरची नरकात रवानगी झाली. तिथे त्याने मेहनत करुन रस्ते, शौचालये, गटारं आदिंची नेटकी व्यवस्था निर्माण केली. अशिच व्यवस्था करण्यासाठी स्वर्गाच्या मॅनेजरने फोन लावला.
स्वर्गाचा मॅनेजर : त्या इंजिनीयरला स्वर्गात पाठवा.
नर्काचा मॅनेजर : अजिबात नाही.
स्वर्गाचा मॅनेजर : मी सांगतोय ते ऎक ! नाहीतर तुला भगवंताच्या न्यायालयात खेचेन.
नरकाचा मॅनेजर : काही हरकत नाही ! मी देखील पाहून घेईन. सगळे टॉपचे वकिल तर माझ्या इथेच आहेत.

शस्त्रक्रिया.

डॉक्टर ऑपरेशन टेबलवरच्या रुग्णाला : " तुम्हाला घाबरायला काय झालं ? घाबरु नका. काही होणार नाही."
रुग्ण : डॉक्टर माझं हे पहिलच ऑपरेशन आहे.
डॉक्टर : बघा माझही हे पहिलच ऑपरेशन आहे तरिही मी घाबरलेलो नाही.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...