--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

थालीपीठ.

वत्सलाबाईंनी बबनरावांना विचारले," आज रात्री जेवायला काय करु ?"
बबनराव, "छान कांद्याचे थालीपीठ करतेस का ?"

वत्सलाबाई, "हो करते, बरेच दिवसात केले नाहित ना ?"

वत्सलाबाई स्वयंपाक घरात गेल्यावर थोड्या वेळाने बबनराव पण तिकडे गेले.

अग अग कांदा बारिक चिरलास ना ? आणि हो त्यात थोडे तिळ पण घाल. आणि ऎकल का मोहन जरा जास्तच घाल थालीपीठ छान खुसखुशीत होतात. तव्यावर पण थोडे तेल जास्त लाव बर का .

वत्सलाबाई चिडल्या व म्हणाल्या मला काय थालीपीठ येत नाहित काय ?

मला काय कार चालवता नाही येत का ?

कॉपी ?

         दोन महिन्यांपुर्वी आमच्या कंपनीत एक नविन साहेब आले. त्यांना ऑफिसचे प्रत्येक काम आपल्या सेक्रेटरीला सांगायची सवय असल्यामुळे कोणतीही मशिन चालवता येत नाही.
         परवा त्यांची सेक्रेटरी रजेवर होती व मला ते संध्याकाळी पेपरचे बारिक तुकडे करणार्‍या पेपर श्रेडर पुढे ऊभे दिसले. त्यांना बघुन मी विचारल ,"सर, काही मदत हविय का ?"

साहेब : हो, मला ही मशिन चालवता येत नाही. जरा मदत कर ना.

मी त्यांच्या हातातला कागद घेतला, मशिन मध्ये घातला व स्टार्ट बटन दाबली. बटन दाबताच कागद आत गेला.

कागद आत गेलेला बघुन साहेब मला म्हणाले," अरे, हा एक अतिशय महत्वाचा कागद आहे मला याच्या दोन कॉपी दे"

श्रमदान.

सांता : अरे बांता इतके दिवस कुठे गेला होतास ?

बांता : अरे मी श्रमदान करायला गेलो होते.

सांता : श्रमदान ? कुठे ?

बांता : जेल मधे . अरे मला सहा महिने सश्रम कारावास झाला होता ना.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...