--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

सुट्टी.

हिटलर एकदा एका ज्योतिषा कडे गेला व त्याला म्हणाल," मी कधि मरणार आहे ?"

ज्योतिषी: "सर, तुम्ही मराल त्या दिवशी ज्यु लोकांचा सुट्टीचा दिवस असेल."

हिटलर: "तुला कसे माहित तो सुट्टीचा दिवस असेल ?"

ज्योतिषी: " सर तुम्ही मराल त्या दिवशी आनंद साजरा करायला नक्कीच सुट्टी घेणार ना."

मरण.

चिंटू: बंटू, किती छान हॊईल ना जर आपल्याला कळले आपण कुठे मरणार आहे ते.

बंटू : तुला असे का वाटते ?

चिंटू: मला जर असे कळले तर मी त्या जागी कधिच जाणार नाही.

शिंग.

कायम शहरातच राहिलेल्या वत्सलाबाई एकदा एका नातेवाईकाकडे खेड्यात गेल्या.

त्यांनी मनोहरपंतांना विचारले," काहो, काही जनावरांना शिंग का नसतात ?"

मनोहरपंत,"त्याच काय आहे वत्सलाताई, कधि आम्ही या जनावरांचे शिंग कापुन काढतो तर कधि ते मोठे होऊ नये म्हणुन शिंगांच्या मुळाशी रसायन टाकून ते जाळून टाकतो."

"तर त्या जनावरांना त्रास होत असेल ना ?", वत्सलाबाई.

मनोहरपंत,"जास्त त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेतो."

"बर सांगा या गाईला शिंग का नाहित ?

मनोहरपंत," याला शिंग नाहित कारण हा घोडा आहे."

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...