--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

अंतर !

सुरेशचा एका आजोबांसोबत वाद सुरु होता. तो म्हणाला,"आजोबा, तुमचा काळ वेगळा होता. आज बघा आमच्याकडे फास्ट कार आहेत, टिव्ही आहेत ज्यावर कायम काहीतरी सुरु असते, जेट विमाने आहेत, अंतराळ प्रवासासाठी वाहने आहेत आणि.................

सुरेश थांबलेला बघुन आजोबा म्हणाले,"हे सर्व आमच्या पिढीने शोधले तुमच्या पिढीसाठी ! तुम्ही तुमच्या पुढल्या पिढीसाठी काय करताय !"

फेसबुकवर बिहारी !

एका बिहारीच्या मित्राने त्याला फेसबुक बद्दल सांगितल. बिहारीने पण आपला फेसबुकवर अकाऊंट उघडला.
सर्व पाहुन तो फारच गोंधळला, त्याला काय करावे तेच सुचेना. त्याने मित्राला काय करायच ते विचारल.
त्याच्या मित्राने त्याला सांगितला,"फेसबुकच्या वॉलवर आपल्याला वाटेल ते लिहायच असत."
बिहारीने फार विचार केला व लिहीले,"यहॉ पेशाब करना मना है ।"

शिक्षणाचा दर्जा !

महाराष्ट्रात अभियांत्रिकी विद्यालयात जागा रिकाम्या रहात असल्याने प्रवेशा साठी आवश्यक गुणांची अट शिथील करण्यात आली आहे.--- बातमी.

राज्यातल्या अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा उंचावणारा निर्णय !!!

यापेक्षा मोठा विनोद कोणता ?

खर्चाला लगाम !

नानासाहेब आपल्या बायकोला घेऊन दात काढायला डॉक्टर कडे गेले.
नानासाहेब,"डॉक्टर, दाता काढायला किती खर्च येतो हो ?"
डॉक्टर,"एक दात काढायला साधारण १००० रुपये लागतात."
नानासाहेब,"एक हजार जरा जास्तच वाटतात."
डॉक्टर,"होय ऍनेस्थेशिया द्यायचे ५०० व दात काढायचे ५०० होतात."
नानासाहेब,"अजुन कमी होतात का बघाना ?"
डॉक्टर,"ऍनेस्थेशिया न देता माझा एक विद्यार्थी हातोडिच्या सहायाने २०० रुपयात दात पाडुन देतो, चालेल ?"
नानासाहेब बायकोकडे हात दाखवून,"हिचे दात काढायचे होते."

Homework का नाही केला ?

सर - homework का नाही केला?


मुलगा - सर लाईट गेले होते.

सर - मेणबत्ती लावायची मग..

मुलगा - काडेपेटी नव्हती.

सर - का?

मुलगा - देवघरात होती.

सर - घ्यायची मग.

मुलगा - अंघोळ नव्हती केली.

सर - का?

मुलगा - पाणी नव्हत.

सर - का?

मुलगा - मोटार चालू होत नव्हती.

सर - का?

मुलगा - आधीच सांगितलं ना लाईट गेलेली म्हणून....
 
 
(आभार : ज्योती साटम )

मेल्यानंतरची काळजी !

खमक्या मालतीबाई पेंटर पुढे बसल्या होत्या व पेंटर त्यांचे चित्र काढत होता. मधेच त्या पेंटरला म्हणाल्या ,"हे बघा, माझ्या चित्रात छान हिर्‍याची अंगठी, सुंदर नेक्लेस, अप्रतीम सुंदर मंगळसुत्र व अजुन काही दागीने दाखवता अलेत तर दाखवा."

"पण तुम्ही यातल कहिच घातलेल नाही." पेंटर म्हणाला.

मालतीबाई," तरिही दाखवा. मला माहितेय मी मेल्यावर हे नक्किच दुसर लग्न करणार तेंव्हा माझा हा फोटो बघुन ती यांना सुखाने जगु देणार नाही."

देव कसा असतो !

एका शिशू वर्गात एकदा बाईंनी मुलांना सांगितल, तुम्हाला आवडेल ते चित्र काढा.

सर्व मुलांनी लगेच दिलेल्या कागदांवर चित्रे काढायला सुरुवात केली.

थोड्या वेळाने वर्गात चक्कर मारताना बाईंनी एका मुलीचे चित्र बघितले व विचारले हे काय काढते आहेस तु ?

मुलगी,"बाई मी देवाचे चित्र काढते आहे."

बाई,"पण देव कसा असतो हे कुणालाच माहित नाही."

मुलगी," थोड थांबा मी चित्र काढल्यावर कळेलच देव कसा असतो ते. "

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...