--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ? 

पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात दिले आहेत . मग तुम्हाला २/४ खडे चावता येत नाहीत ?

शोकसंदेश

येणाऱ्या काळात एखादा

माणूस मयत झाला तर शोकसंदेश अशा प्रकारचा असू शकेल.....!

खरोखर खूप चांगला माणूस होता..

"नेहमी ऑनलाइन असायचा..."

"प्रत्येकाची रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करायचा."

"कुणीही आपल्या कमेंटने कधी दुखावले जाऊ नये याची काळजी घ्यायचा."

"त्याची पोस्ट खुपच इंप्रेसिव्ह असायची."

"मोठ्या हृदयाचा माणूस होता. कधी कोणाला ब्लॉक नाही केलं."

"मित्रांच्या सेल्फीला आणि फोटोंना मोठ्या मनाने लाईक करायचा."

"काही नाही झालं तरी इतरांच्या पोस्टला

😂✔👌🏻🙏🏼👻😜

वगैरे सिंबॉल टाकून त्यांच्या पोस्टला दाद द्यायचा."

"जेव्हा मरण आलं तेव्हा पण फेसबुकवर ऑनलाईन बसला होता. खूपच चांगला माणूस होता. ....

😜😜

न्यूटनच्या बायकोचा उखाणा

न्यूटनच्या बायकोचा उखाणा :-

आईला पाहून बाळ खुदुखुदू हसलं…
आईला पाहून बाळ खुदुखुदू हसलं…
डोक्यावर पडलं सफरचंद,
तर खायचं सोडून येडं शोध लावत बसलं…!!

पत्नीची डोकेदुखी

पत्नी : रोज माझे अर्धेच डोके दुखते. डॉक्टर ला दाखवावे लागेल .

पती पेपर वाचायच्या तंद्रीत म्हणतो : त्यात डॉक्टर ला काय दाखवायचे ? जेवढे आहे तेवढेच दुखणार !

आता पतीचे सर्व अंग दुखते आहे !!!

रॉकेट पासून काय शिकायला मिळते ?

 शिक्षक : रॉकेट पासून काय शिकायला मिळते ?

विद्यार्थी : बुडाला आग लागल्या शिवाय आयुष्यात उंची गाठता येत नाही . 

उत्तर ऐकून शिक्षक १० लिटर पाणी प्यायले  !!!

सज्जन पती

शिला मिनाला : माझे पती येवढे सज्जन आहेत की ते परस्त्री कडे आजिबात बघत नाहीत

मिना : माझे पती तर 4 पावले पुढे आहेत की ते माझ्या कडे पण बघत नाहीत.

फरक !

बायको नवऱ्याला : तुम्हाला झाडावर चढता येते का ?

नवरा : नाही . 

बायको : तुमच्यापेक्षा  माकड बरा . 

नवरा बिचारा कसा बसा २ महिन्यात झाडावर चढायला शिकतो . 

नवरा बायकोला : हे बघ मी झाडावर चढू शकतो . 

बायको : तुमच्यात आणी माकडात काय फरक राहिला !!!

स्वर्ग

पत्नी पतीला : असं ऐकले आहे की स्वर्गात पती पत्नीला एकत्र राहू देत नाहीत

पती : अगं वेडे म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात !

एक यशस्वी नवरा ...

लोक आपल्या बायकांना इतके का घाबरतात, काही समजतच नाही…

मी मात्र याला अपवाद आहे. माझ्या घरचा मी राजा आहे.

जेव्हा मला थंड पाण्याने भांडी धुवायचा मूड असतो, तेव्हा मी थंड पाण्याने धुतो, जेव्हा गरम पाण्याने धुवायचा मुड असतो, तेव्हा गरम पाण्याने धुतो.

याबाबतीत मी इतर कोणाचंच ऐकत नाही।।।

लादी पुसताना फिनाईल घ्यायचं की लायझोल,

माझं मीच ठरवतो…

एक शब्द बोलायची बायकोची हिम्मत नसते…

सकाळचा चहा बनवून बायकोला जागं केल्यावर, चहा बेडवरच प्यायचा, की ड्रॉईंग रूम मध्ये प्यायचा की बाल्कनीत बसून प्यायचा, निर्णय माझाच असतो. काय हिम्मत आहे ती लुडबुड करेल…

कपडे सर्फ एक्सेलने धुवायचे की टाईड ने, तिथेही माझंच राज्य चालतं…

याबाबतीत तर मी बायकोला इतकं अज्ञानी करून ठेवलंय की तिला अजून वॉशिंग मशीन कशी चालवावी, हेही माहीत नाही…

कोणत्या झाडूनं घर झाडायचं, हा निर्णय दस्तुरखुद्द आम्हीच घेतो.

जेवायला काय बनवायचे हे बायको कोण सांगणार? माझ्या इच्छेनुसार मीच तिला विचारून बनवतो…

काच ओल्या फडक्याने पुसायची की कोलीन शिंपडून, चर्चा होतंच नाही…

रविवारी शौचालय सकाळी स्वच्छ करायचं कि संध्याकाळी, हे देखील मीच ठरवतो…

आणि सर्वात महत्वाचं ...

रात्री झोपण्यापूर्वी तिचं डोकं आधी चेपायचं की पाय, निर्णय माझाच असतो…

मी on the spot निर्णय घेतो.

अरे बाबांनो, घरातील सर्व मोठे निर्णय घेता येणं, यात तर खरी पुरुषाची शान आहे!

पण तुम्ही निराश होऊ नका. माझा हेतू तुम्हाला जळवायचा किंवा तुमचं मनोबल खच्ची करण्याचा नाही…

एक यशस्वी नवरा ...

Missed Call

पोरींनी Missed Call ला इतकं बदनाम केलं आहे की,.
.
.
चुकून कधी मित्राचा Missed Call आला तरी आई म्हणते…..

जा बघ….तुझी राणी तुझी आठवण काढतेय

चष्मा

डॉक्टर : चष्मा कोणासाठी बनवायचा?

बबलू :  माझ्या  शिक्षकांसाठी 

डॉक्टर : पण का?

बबलू- कारण ते माझ्याकडे बघून मला गाढव म्हणतात  !

X

गणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्याडब्यात चपाती बुडवून खात होते...

मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात तर काहीच नाही...

गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला 'एक्स' मानल आहे..!

पैसे वाचवा !

हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड सोबत गेल्यावरतुमचे पैसे वाचू शकतील..

फक्त तिला म्हणा कि,

बोल जाडे ! आज काय खाणार ?

बायको !

13 वर्ष केस चालली तरी पण कोर्टाला कळले नाही
की सलमान दारु प्याला होता की नाही.

आणि आमच्या बायका…

नुसतं फोन वर hello म्हटलं की,
कमी प्या आणि लवकर या घरी ….असं म्हणतात..

पिवळा रंग

मुलगा – मला तुझे दात खूप आवडतात

मुलगी – अय्या खरंच

मुलगा – हो कारण पिवळा माझा फेव्हरेट रंग आहे  !!!

उशीर

शिक्षक: उशीर का झाला शाळेत यायला ?

चिंटू: आई बाबा भांडत होते,

शिक्षक: त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध ? 

चिंटू: माझा एक बूट आईच्या हातात व दुसरा बाबांच्या हातात होता.

खेळ खल्लास !

एका सासूने आपल्या नवीन सुनबाईला विचारले- समजा, तू पलंगावर बसली आहे आणि मी तुझ्या बाजूला येऊन बसली
तर तू काय करशील…???

सुनबाई- तर मी पलंगावरून उठून सोफ्यावर बसून जाईल…..!!!!

सासू- आणि जर मी सोफयावर येऊन बसली तर???

सुनबाई- तर मी उठून खाली चटईवर बसून जाईल…!!!

सासू- जर मी खाली चटईवर बसली तर तू काय करशील…??

सुनबाई- मी चटई काढून जमिनीवर बसून जाईल…!!!

सासू (उत्सुखं होऊन)- मी पण चटई काढून तुझ्या बाजूला जमिनीवर येऊन बसली तर काय करशील??????

सुनबाई (कंटाळून)- तर मग मी जमिनीत खड्डा करून त्यात बसून जाईल???

सासू- जर मी खड्ड्यात येऊन बसून गेली तर ????

सुनबाई- मग मी खड्यात माती टाकून हा मॅटर संपून टाकेल…. सुनबाई रॉक सासूबाई शॉक….
😂😂😂

महाराणी

एक इंग्रज एका भारतीया ला विचारतो : भारतीय स्त्रिया भेटल्यावर हात का मिळवत नाहीत ? त्यात काही नुकसान नाही .

भारतीय : तुमच्या देशात कोणी सामान्य व्यक्ति तुमच्या महाराणी शी हात मिळवू शकतो का ?

इंग्रज : नाही !

भारतीय : आमच्या देशात सर्व स्त्रिया महाराणी आहेत !

नापास !

बाबा: चंप्या पुन्हा नापास झालास ?

जरा त्या पिंकीकडे बघ,तिला नव्वद टक्के मिळाले आहेत..

चंप्या: तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो !

कामचोर बायको

घटस्फोटाच्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू असते…



वकील : एवढं काय झालं की मधुचंद्राच्या रात्रीच तुम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला?


नवरा : मी तिला लाडानं म्हटलं, जरा चेहऱ्यावरचा पदर बाजूला कर… तर ती म्हणाली तुम्हीच करा…


तेव्हाच समजलं की ही बाई एक नंबरची कामचोर आहे…

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...