--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.: परिक्षा !

परिक्षा !

कॉलेजमध्ये आमच्या वर्गात चार अतिशय व्रात्य मुले होती.
चाचणी परिक्षेच्या अगोदर चौघेही रात्री बर्‍याच वेळ खेळत होते. दुसर्‍या दिवशी परिक्षे आधि चौघेही प्राचार्यांकडे फारच खराब झालेले घाणेरडे कपडे घालून गेले व काल रात्री आम्ही एका लग्नाला गेलो होतो व परत येताना आमच्या कारचे टायर फुटल्याने आमची ही अवस्था झाली आहे असे प्राचार्यांना सांगितले.
प्राचार्य म्हणाले बर पण चारच दिवसांनी मी तुमची चौघांची चाचणी घेणार. असे ऎकून मुले फार खुष झाली.
चौथ्या दिवशी चौघेही परिक्षेला गेले.
प्राचार्य त्यांना म्हणाले ही परिक्षा मी काही परिस्थीती मुळे पूढे धकलली आता तुम्ही तयारी करुन आला असाल तर मी परिक्षा घ्यायला तयार आहे. पण चौघांनाही वेगवेगळ्या खोलीत बसवणार व फक्त दोनच प्रश्न विचारणार.
दोनच प्रश्न ऎकून मुलांना आनंद झाला.
मुलांना चार खोल्यात बसवण्यात आले व प्रश्नपत्रिका देण्यात आली.
त्यातील प्रश्न होते.

प्रश्न १ तुमचे नाव काय आहे ? (०४ गुण)
प्रश्न २ तुमच्या कारचा कोणता टायर फुटला होता ? (९६ गुण)
अ. समोरचा डावा.
ब. समोरचा उजवा.
क. मागचा डावा.
ड. मागचा उजवा.

५ टिप्पण्या:

  1. धन्यवाद अनिकेत !
    मी हा किस्सा ऎकला होता पण IIT त असे घडेल असे वाटले नव्हते. मी हा किस्सा मित्रांच्या बोलण्यात ऎकला होता तो दुसर्‍याच एका प्रकरणात होता व थोडासा वेगळा होता.
    त्याला किंचीत बदलून मी तो येथे मांडायचा प्रयत्न केला.

    दिनेश.

    उत्तर द्याहटवा
  2. Advantage of speaking truth is ! You dont have to remember what you have said in past !

    उत्तर द्याहटवा

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...