एकदा एका गावात एक माणुस आला. त्याने गावकर्यांना सांगितले की त्याला माकडे पकडायची आहेत. प्रत्येक माकडामागे तो गावकर्यांना दहा रुपये देईल.
गावकरी खुश झालेत व जवळच्या जंगलात जाउन माकडे पकडायला लागलेत.
माकडे पकडायला गावकर्यामधे स्पर्धाच लागली. प्रत्येक जण माकडे पकडायचा व तो माणुस त्यांना माकडामागे दहा रुपये द्यायचा.
काही दिवसांनी माकडे कमी सापडू लागली तेंव्हा त्या माणसाने गावकर्यांना सांगीतले तो आता माकडामागे वीस रुपये देईल. गावकर्यांनी बाजुच्या जंगलातुन माकडे आणली व माकडामागे वीस रुपये वसुल केलेत.
काही दिवसांनी त्याने माकडामागे तीस रुपये देतो असे सांगीतले व फार थोडे माकड खरेदी केलेत कारण गावकर्यांना माकडे सापडेनात.
आता माकडे पन्नास रुपयाला खरेदी करतो असे सांगून तो वाट बघू लागला. गावकरी त्याला माकडे देऊ शकले नाहीत तेंव्हा तो त्यांना म्हणाला ," मी काही दिवसांत जवळच्या शहरात जाऊन येतो तो पर्यंत माकड सापडल्यास त्याच्या मदतनिसाकडे जमा करावी व तो त्यांचे पैसे देईल.
माणुस शहरात गेल्यावर त्याचा मदतनिस गावकर्यांना म्हणाला तुम्हाला माकडे सापडत नसल्यास तो जमा झालेले माकड पस्तीस रुपयांना गावकर्यांना देईल व तो माणुस शहरांतुन परत आल्यावर तेच माकडा गावकरी त्याला पन्नास रुपयांना विकू शकतात म्हणजे त्यांना पंधरा रुपयांचा फायदा होईल.
गावकर्यांना योजना पटली व त्यांनी शक्य तिथुन पैसे गोळा करुन पस्तीस रुपयांना माकड खरेदी केले. सर्व माकड पस्तीस रूपयांना विकुन मदतनिस शहरात गेला. त्यानंतर गावकर्यांना तो माणुस दिसला नाही व त्याचा मदतनिसही. पण सर्व गावात फक्त माकड दिसु लागलेत.
असा चालतो शेअर बाजार !!!
kharach manapasun sangato ki khoop avadal tumacha ha vinod.
उत्तर द्याहटवाyala vinod hi manata yenar nahi bagh karan reality hi asich aahe.ko ki nahi?
share bazar ha paisacha bazar.ithe kunihi kunala sahaj murkh banau skate?
vadat nahi pan aso..........