मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

July, 2009 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वप्ने बघा !

बाबा : राजु, हल्ली तु फार झोपतोयस.
राजु : हो बाबा.
बाबा : काय झाल ? तब्येत ठिक आहे ना ?
राजु : हो बाबा, मागच्या रविवारी मी त्या भाषणाला गेलो होतो ना. त्यांनी सांगितलय स्वप्ने बघा तरच मोठे व्हाल. म्हणुन मी झोपायला लागलोय. झोपलो तरच स्वप्ने पडतील ना.

ब्रेक ?

बांता : अरे सांता, तु कार इतक्या वेगात का चालवतो आहेस ?
सांता : अरे कारचे ब्रेक फेल झालेत. मला वाटते लौकरच घरी पोहचलेल बर.

लौकरच येत आहे !

सांताचे बायको सोबत भांडण झाले.
सांता स्मशानात गेला व तेथील झाडावर बायकोचा मोठ्ठा फोटो लावून खाली लिहीले.
"लौकरच येत आहे."

प्रार्थना.

शिक्षक : राजू तु जेवण्यापूर्वी प्रार्थना करतोस का ?
राजू : नाही सर, तशी गरज नसते. माझी आई फार चांगला स्वयंपाक करते.

परंपरा.

शिक्षक : शाम, तु वर्गात फार बोलतोस.
शाम : ती आमची परंपरा आहे.
शिक्षक : याचा अर्थ काय आहे ?
शाम : माझे आजोबा रस्त्यावर फेरीवाले होते, आणि वडिल शिक्षक.
शिक्षक : आणि आई काय करते ?
शाम : ती एक स्त्री आहे.