मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

March, 2012 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कंजुस मारवाडी !

एकदा एक मारवाडी रेल्वेने प्रवास करत होता. गाडीत त्याच्या समोर एक चिनी माणुस येऊन बसला. काही वेळाने त्या चिनी माणसाला एक डास चावायला लागला. त्याने तो डास मारला व खाऊन टाकला.


थोड्या वेळाने त्या मारवाडी माणसाच्या हातावर पण एक डास बसला. मारवाड्याने तो डास पकडला व त्या चिनी माणसाला विचारले," विकत घेतोस का ?"

नव वर्षाच्या शुभेच्छा.

सर्वांना नुतन वर्षाच्या मनःपुर्वक शुभेच्छा हे नववर्ष आपणास सुखसमृद्धीचं आणि इच्छापुर्ती करणारं जावो हिच देवाचरणी प्रार्थना !

भाषा !

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं. यांनी सरकारी  कामकाजातील दुर्बोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले,"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं मी  जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मला कळेना!
आता कळलं.  'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही माहीती मिळाली, ... असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं असतं?
म्हणजे आता  आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती 'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं  म्हणायला हरकत नाही!"

हाव !

एकदा गणपतरावांनी शॅम्पुचा एक पॅक विकत आणला. दोन दिवस वापरल्यावर ते त्यावर फारच खुष झाले व अतिउत्साहाच्या भरात त्यांनी त्या शॅम्पुच कौतुक करणार एक मोठ्ठ पत्र त्या कंपनीच्या पत्यावर पाठवल. आठवड्यात कपनीने त्यांना त्यांच्या इतर उत्पादनांनी भरलेले एक मोठ्ठ पार्सल पाठवल. गणपतराव फारच खुष झाले.
त्यांची बायको पण गणपतरावांच्या हुशारीने भाराऊन गेली.
गणपतरावांना त्यानंतर म्हणाली," आता काय करायच ?"
गणपतराव म्हणाले," आता मी एखाद्या कारच कौतुक करणार पत्र कंपनीला पाठवतो, बघुया ते किती गाड्या पाठवतात !"

विजयाचे रहस्य !

उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्यावर समाजवादी व कॉंग्रेसचे उमेदवार असलेले दोन राजकारणी भेटतात व  समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाचे रहस्य काय असावे यावर चर्चा करित असतात.

कॉंग्रेसचा उमेदवार : मी माझ्या पक्षाचा विजय होईल याची कायम काळजी घेत होतो. समजा मी टॅक्सीने प्रवास केला तर त्या टॅक्सी ड्रायव्हरला १०० रुपयाची टीप देउन कॉंग्रेसला मतदान करायला सांगायचो.

समाजवादी पक्षाचा उमेदवार : मी पण तसच करायचॊ. मी टॅक्सी ड्रायव्हरला मीटर प्रमाणेच भाडॆ द्यायचो व कॉंग्रसला मतदान करायला सांगायचो.