मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

December, 2011 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काळ्या !

छोटी मुलगी दुकानदाराल विचारते,
"काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची cream आहे का ?"
दुकानदार -" हो आहे ना..."
मुलगी - "मग लावत जा ना काळ्या, मी रोज किती घाबरते !!!"

(फेसबुक वरुन)

हलाहल !

शेवंताबाईंसोबत लग्न झाल्या दिवसा पासुन बळवंतराव बायकोच्या स्वभावामुळे जीवनाला कंटाळले होते. रोज रोजच्या भांडणापासुन मुक्ती मिळावी या विचाराने ते एक दिवस भांडण चालू असतानाच तडक बाजारात गेले व विषाची बाटली घेऊन आले.

बायको काही ऎकत नाही हे बघुन त्यांनी बाटली फोडली व गटागटा विष पिऊन झोपले. त्यांना वाटले झोपल्यावर विषाचा परिणाम लौकर होणार व त्रासही होणार नाही.

दोन तासांनी बळवंतरावांना जाग आली हे बघुन पुन्हा शेवंताबाईंनी आपली टकळी सुरु केली,"तुमच कोणतही कामा असच असते. आता बघाना आज विष आणल पण काही फायदा झाला का ? ......................................."

गावातली पहिली तंदूर भट्टी !!!

बंडू : मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ?
मास्तर : बर बाळा, विचार .
बंडू : मास्तर ,मला सांगा आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कोणत्या धाब्यावर लावली..??
मास्तर: अरे मला कस माहित ? हा काय प्रश्न आहे का ?
बंडू: जर तुम्हाला आपल्या गावातली पहिली तंदूर भट्टी नाही माहित तर मग आम्हाला देशातली पहिली अणुभट्टी कुठे लागली हे का विचारता ....?
मास्तर : अरे गाढवा मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कस माहिती ?
बंडू : मग आम्ही काय दररोज अणुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला .........!