मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

July, 2010 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बुद्धिबळ !

सांता एके दिवशी सुट्टी बघून आपल्या कुत्र्यासोबत बुद्धिबळ खेळायला घराच्या अंगणात बसला.


त्याच्या मित्राने समोरुन जाताना सांता कुत्र्यासोबत बुद्धिबळ खेळत असल्याचे बघितले व तो त्यांचा डाव बघायला तेथे थांबला.


"सांता, माझ्या पहाण्यातला हा सर्वात हुशार कुत्रा आहे.", मित्र म्हणाला.


सांता," नाही रे, पाच डांवां मधले तो फक्त दोनच डाव जिंकलाय."

बॉसचे अपहरण.

एका कंपनीत सकाळीच खुप धावपळ सुरु झाली. सर्वच लोकं इकडून तिकडे धावपळ करित होते.
.
.
.
काही नविनच रुजु झालेले कर्मचारी धावपळ बघून फारच धास्तावले.
.
.
.
त्यातल्या एकाने मोठ्या हिंमतीने एका जून्या कर्मचार्‍याला विचारले,"काय झाले ?"

आपल्या बॉसला अतिरेक्यांनी पळवले. अतिरेकी बॉसला सोडायला दहा कोटी खंडणी मागताहेत.
नाहीतर ते आपल्या बॉसला पेट्रोल टाकून जाळुन टाकणार.
.
.
.
.
काही लोक त्यासाठीच प्रत्येकाला काही मदत देता येईल का ते विचारायला धावताहेत.


"लोक किती मदत देताहेत ?", नविन कर्मचार्‍याचा प्रश्न.
.
.
.
.
"एक लिटर पेट्रोल.", जून कर्मचारी उत्तरला.

ऊंची !

एक अभियंता, एक गणितज्ञ व एक भौतिक शास्त्रातला तज्ञ एका खांबाजवळ उभे होते. त्यांना प्रश्न पडला होता कि या खांबाची ऊंची कशी मोजायची, असे कोणते सूत्र या खांबाची अचूक ऊंची काढून देईल ?
तितक्यात एक मराठीचा प्राध्यापक तेथे आला.
मराठीचा प्राध्यापक," काय झाल ? सर्वच काळजीत दिसताय ?"
अभियंता,"आम्ही या खांबाची ऊंची मोजण्या साठी एक सूत्र तयार करतोय. या सूत्राने याची अचूक लांबी मोजता येणार."
प्राध्यापक," त्यात काय एक्दम सोप आहे ते. मी तुम्हाला ती मोजुन दाखवतो."
मराठीच्या प्राध्यापकाने तो खांब तेथून काढला, जमिनीवर आडवा ठेवला, एक पट्टी आणली व मोजून सांगीतले १८ फूट व खांब परत जागेवर नेऊन ऊभा केला.गणितज्ञ : अरे आम्हाला याची ऊंची मोजायची होती, याने तर खांबाची लांबी सांगितली !

मैत्री.

सांता ने नविन मोबाईल घेतला.
त्याच्या मित्रांनी मिठाई मागितली.
सांता बाजारात गेला. त्याच्याकडे फार पैसे नव्हते.त्याने मोबाईल विकला.आणि मित्रांना मिठाई खाऊ घातली .

पैसा.

माणसाच्या आयुष्यात पैसा सर्व काही नाही.
विसा आणि मास्टर कार्ड आहेत ना !