मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

June, 2009 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

केशकर्तन.

बॉस : तुम्ही कार्यालयाच्या वेळात केस कापायला गेला होता, तुमच्यावर कारवाई का करण्यात येवू नये ?
बबन : केस पण तर कार्यालयाच्या वेळेतच वाढले होते ना.
बॉस : पण सगळे नाही.
बबन : मी तरी सगळे केस कुठे कापलेत ?

नोटीस.

एकदा माझ्या एका मित्राला आयकर खात्याकडून आयकर कमी भरल्याची दूसरी नोटीस आली. त्याने ताबडतोब पहिल्या नोटीसला उत्तर न दिल्याबद्दल खेद व्यक्त केला व सविस्तर उत्तर लिहून आयकर कार्यालयात गेला. तेथे संबंधित अधिकार्‍याला भेटल्यावर तो अधिकारी म्हणाला, "फार वाईट वाटून नका घेऊ. आम्ही पहिली नोटीस पाठवलीच नव्हती. आमचा अनुभव असा आहे की दुसरी नोटीसच फार प्रभावकारी असते !!!"

TV वर काय आहे ?

कालचीच गोष्ट. मी बरेच दिवसांनी TV बघायला बसलो.
माझी सौ नेहमी प्रमाणे स्वयंपाक घरात व्यस्त (त्रस्त ?) होती.
काही वेळाने ती पण TV बघायला बाहेर आली व मला म्हणाली," TV वर काय आहे ?"
"धूळ !" माझॆ प्रामाणीक ,उत्तर आणि दिवसभर भांडण पुरले !!!

उत्सुकता.

न्यायमूर्ती : तुझे वकिल आजारी आहे म्हणून सुनावणीची तारीख पुढे धकलावी असे तु म्हटलेय. पण तुला रंगेहात पकडलंय आणि चोरीचा आरोप ही तु मान्य केलाय. तर तुझे वकिल तुझी बाजू मांडणार तरी काय ? आरोपी : साहेब, तुमच्या प्रमाणेच मलाही तीच उत्सुकता आहे !!!

वकिली सल्ला.

शेतकरी : वकिलसाहेब, कोणाची म्हैस माझ्या शेतात शिरली व तिने शेतातले पिक खाल्ले तर मी काय करावं ?
वकिल : तुम्ही त्या म्हशीच्या मालकाला झालेली नुकसान भरपाई मागु शकता.
शेतकरी : द्या तर मला ४०० रुपये. काल राती तुमचीच म्हैस माझ्या शेतात शिरली होती.
वकिल : खर तर तुम्हीच मला १०० रुपये देणे लागता. ५०० रुपये माझा सल्ला घेतल्याचे. त्यातुन तुमचे नुकसान झाल्याचे ४०० रुपये वजा करा व माझे १०० रुपये आणा.

नेपाळी.

एकदा एका नेपाळी माणसावर देव प्रसन्न झाला.
देवाने त्याला ३ ईच्छा विचारल्या.
नेपाळी म्हणाला : १. खुप मोठ्ठा बंगला.
२. त्यात एक खुप श्रीमंत माणुस.
आणि ३. त्या बंगल्याचा गुरखा मला बनव.