मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

March, 2009 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रामाणिक माणूस.

एकदा एका कारखान्याच्या अध्यक्षांनी आपल्या सर्व अधिकार्‍यांची वार्षिक बैठक बोलावली. अध्यक्षांनी बैठक संपवताना घोषणा केली कि थोड्या वेळाने सर्वांना एक मातीची कुंडी, एका पिशवीत माती व काही बियाणे देण्यात येतील. जो कुणी पुढच्या वर्षी वार्षिक बैठकीत सर्वात चांगले झाड दाखवेल त्याचा त्या बैठकीत सत्कार करण्यात येईल. सर्व अधिकार्‍यांनी घरी गेल्यावर ते बियाणे दिलेल्या मातीतच पेरले. वर्ष उलटले व परत वार्षिक बैठकीची वेळ आली. बैठकीचा हॉल विविध प्रकारांच्या सुंदर झाडानी भरुन गेला. काही झाडांना तर फुलेही आली होती. पण या सर्वात एक अधिकारी हिरमुसलेला पडल्या चेहर्‍याने दिलेली कुंडी व माती तशिच घेऊन एका कोपर्‍यात बसुन होता. सर्वांची झाडे बघितल्यावर अध्यक्षांनी मंचावर जावून माईक हाती घेतला व भाषण आटोपतांना त्या हिरमुसलेल्या अधिकार्‍याला बक्षिस जाहिर केलं. सर्व थक्क झाले. त्याने तर फक्त कुंडी व माती तशिच आणली होती. सत्कार झाल्यावर अध्यक्ष बोलले," तुम्हा सर्वात हा एकच प्रामाणिक माणूस आहे. तुम्हाला देण्यात आलेले बियाणे पाण्यात उकळण्यात आले होते. त्यामुळे त्यातुन झाडे लागणे अशक्य हो…

सांताचा विमान प्रवास.

सांताला दिल्लीहून तातडीने अमृतसरला जायचे होते.
बर्‍याच जणांना विचारल्यावर सांता विमानाने जायचे ठरवतो.
विमानाने त्याचा पहिलाच प्रवास असल्याने तो थोडा अस्वस्थच असतो.
सर्व सोपस्कार पूर्ण करुन तो विमानातली आपली जागा पकडतो.
खिडकी मिळाल्याने सांता आनंदात असतो.
सांता खिडकीतुन बाहेर बघत असतो. विमान सुटते.
धावपट्टीवर धावायला लागते.
सांता आपल्या जागेवरुन उठतो व कॉकपिट मध्ये जावून पायलटच्या काना खाली दोन ठेवतो.
कारण ?
?
?
?
?
?
?
त्याला वाटते पायलट ते विमान रस्त्याने नेणार आहे !

खटला !

त्याने कंटाळून, अतिशय रागाने आपल्या बायकोला मगरींच्या तलावात फेकले.
.
.
.
.
आणि
.
.
.
.
पशु मित्रांनी त्याच्यावर मगरिंचा छळ केल्याचा खटला लावला.