Olx

रविवार, २२ फेब्रुवारी, २००९

सोय.

एकदा मी एका दुकानात गेलो होतो. बरिच गर्दी असल्याने मला थांबाव लागणार होत. काही वेळाने तो दुकानदार काहीसा काळजीत दिसला, कारण त्याचा एक ग्राहक त्याचा मोबाईल फोन तिथे विसरला होता.
थोड्यावेळाने दुकानदाराला सुचल कि त्यातील काही क्रमांक बघावे व मोबाईल सापडल्याचा निरोप द्यावा. एक नंबर "आई" नावाने होता.
दुकानदाराने "आई"ला फोन करुन मोबाईल त्याच्याकडे असल्याच सांगीतल.
थोड्या वेळाने "आई"चा फोन आला व तिने सांगितल, "बेटा तु तुझा फोन या दुकानात विसरला आहेस."

Olx