Olx

रविवार, १३ एप्रिल, २००८

पुण्याचे दुकानदार

पुण्यातील दुकाने दुपारी १ ते ४ विश्रांती साठी बंद असतात . यादरम्यान दुकानदारांना कुणी त्रास देवू नये ही त्यांची लहानशी अपेक्षा असते.

एकदा असंच दुकान बंद केल्यावर एका दुकानाला आग लागली. फायर ब्रिगेडचे बंब आले. दुकानातील आग विझवत असतांना एका जवानाने दुकान मालकाला फोन करुन आग लागल्याची खबर देण्याचा प्रयत्न केला असतांना दुकानदार म्हणाला, " आम्ही दुकान दुपारी १ ते ४ बंद ठेवतो हे दुकानाबाहेरील फलकावरुन आपल्याला कळलेच असेल, आम्ही दुपारी ४ वाजता दुकान उघडल्यावर आपणांस काय करायचे ते करा तरी परत फोन करायची तसदी घेवू नये" !

Olx